बीड तालुक्यातील एका २७ वर्षीय महिलेचा विवाह २०१९ ला झाला होता. तिचे लग्न घाटकोपर येथे ठरले होता. त्यामुळे तिला गुरु आई असलेल्या महिलेने गडगनेर खायला बोलवले होते. याच जेवणात गुंगीचे औषध टाकून त्याच रात्री तिच्या शेजारी सध्याचा पती असलेल्या मुलाला झोपवले त्याचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि घाटकोपरच्या नियोजित वराला पाठविला या प्रकरणी पिडीता पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली. परंतु गुरुआई म्हणवणाऱ्या महिलेने माफी मागत हे प्रकरण इथेच मिटवले. तसेच ज्याच्यासोबत व्हिडिओ बनवला त्याच्यासोबत लग्न लावून दिले परंतु त्याचे अगोदर एक लग्न झाल्याचे पिडीतेला सासरी आल्यावर समजले तिने याबाबत विचारणा केल्यावर तिला धमकावण्यात आलं.
पिडीतेने कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण दाखल केलं. न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर हेच नातेवाईक तिच्या पाया पडले व माफी मागितली व हे प्रकरण मिटवून घेण्यास सांगितले. त्यानंतर जुलै २०२२ मध्ये पिडीता सासरी आली परंतु सासू-सासरा यांच्याकडून तुझा नवरा काहीच कमवत नाही. त्यामुळे तुला खायला देणार नाही असे म्हणत तिला त्रास देऊ लागले. ऑगस्ट ते सप्टेंबर २०२२च्या दरम्यान दिराने तिची मासिक पाळी सुरू असताना तुझे त्या जागेतून निघणारे रक्त दे, असे म्हणत मारहाण केली. पिडीतेने नकार दिल्याची माहिती इतरांना दिली त्यानंतर पिडीतेला सर्वांनीच एका खोलीत बांधून ठेवत आघोरी कृत्य केले.
महिलेला तिला तीन दिवस उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. हा अन्याय असह्य झाल्याने पीडितेने माहेर गाठले. तेथे आईच्या मदतीने काही समाजिक कार्यकर्त्यांना आपली व्यथा सांगितली. त्यानंतर पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात पती सासरा -सासू दिरासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता हाच गुन्हा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याचे तज्ञांनी सांगितला आहे. मात्र, अघोरी प्रकाराचा हा कळस आणि सतत स्त्रियांवर होणारे अन्याय हे कुठेतरी हाताबाहेर जात असल्याचे पाहायला मिळतंय. मात्र यामध्ये सासरच्या लोकांना तिच्या मासिक पाळीतील रक्त घेऊन नेमकं काय करायचं होतं? हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाहीये.
फ्लॅटमध्ये आग; जीव वाचवण्यासाठी तरूणी खिडकीबाहेर स्लॅबवर बसून राहिली; अग्निशमन दलामुळे सुटका