चंद्रपूर : वाघ म्हटलं की सगळ्यांचा थरकाप उडतो. पण हाच वाघ घाबरून पळून गेल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वाघाने म्हशीच्या पिल्यांचा पाठलाग केला. एका पिल्लावर हल्ला केला. नेमकं त्याचवेळी पिल्याची आई धावून गेली. वाघाच्या तावडीतून तिने पिल्लाची सुटका केली अन् वाघालाही पळून लावलं. हा थरार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र परिसरात घडली आहे.

वाघाचा जिल्हा अशी चंद्रपुरची ओळख आहे. केवळ ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पातच नव्हे तर खुल्या वन क्षेत्रातही वाघांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील वाघ मानव संघर्ष टोकाला पोहचला आहे तर दुसरीकडे येथील वाघाच्या करामतीची भुरळ देश विदेशातील पर्यटकांना आहे. ताडोबा आणि खुल्या वनक्षेत्रात वाघाच्या शिकारीच्या अनेक घटना कॅमेरात कैद झाल्या आहेत. जाच्या नुसत्या डरकाळीने अख्खं रान शाहरुन उठतं. त्या राजाशी थेट म्हस भिडली.

अबब! चंद्रपुरात रात्रीच्या अंधारात काय दिसलं पाहा, अभ्यासकही आश्चर्यचकित…
चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र परिसरात घडलेला हा थरार एका व्यक्तीने मोबाईलच्या कॅमेरात कैद केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात म्हशीच्या पिल्लांना भक्ष करण्यासाठी वाघ पाठलाग करीत आहे. म्हशीचे पिल्लू जीव वाचवण्यासाठी धावत सुटले आहेत. शेवटी तो वाघाच्या तावडीत सापडतो. त्याच वेळी त्या पिल्यांची आई वाघावर तुटून पडते. तिच्या मदतीला म्हशींचा झुंड धावून येतो. म्हशी वाघाच्या मागे धावतात आणि वाघ त्यांना घाबरून पळून जातो.

वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा, फोटो काढून मौलानाला पाठवला अन्…

2 COMMENTS

  1. Nice post. I learn one thing more difficult on completely different blogs everyday. It can at all times be stimulating to learn content material from different writers and practice slightly one thing from their store. I抎 choose to make use of some with the content material on my weblog whether or not you don抰 mind. Natually I抣l provide you with a hyperlink in your net blog. Thanks for sharing.

  2. I am just commenting to make you be aware of what a wonderful experience our princess obtained visiting your web site. She came to find plenty of issues, which included what it’s like to have a very effective coaching mood to make other folks without difficulty know precisely selected grueling things. You really exceeded my expectations. Thank you for distributing such practical, dependable, educational not to mention unique guidance on this topic to Lizeth.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here