जालनाः श्री क्षेत्र गणपती राजूर या भोकरदन तालुक्यातील तिर्थक्षेत्रावर वीरशैव लिंगायत समाजाच्या एका महिलेच्या पार्थिवावर शनिवारी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत..

दहा वर्षापासून स्मशानभूमीची मागणी करणाऱ्या वीरशैव लिंगायत समाजाची उपेक्षा करणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ राजूर येथील वीरशैव लिंगायत समाजातील नागरिकांनी हे पाऊल उचलले आहे. गणपती मंदिराच्या पायथ्याशीच असलेल्या शासनाच्या विश्रामगृहातच्या इमारतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोरच वीरशैव लिंगायत परंपरेनुसार महीलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शेकडो समाजबांधव उपस्थित होते.

एका जेसीबी यंत्राचा अंत्यसंस्कारासाठी उपयोग करण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्रपणे स्मशानभूमी देण्यात यावी अशी येथील वीरशैव लिंगायत समाजाची मागणी आहे. मात्र शासनाच्या विविध स्तरावर या मागणीसाठी अनेक अडथळे निर्माण झाले ,ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी, तहसीलदार भोकरदन यांच्या विरोधात लिंगायत समाजाच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत अडथळे दूर करण्यासाठी कोणी प्रयत्न केले नाहीत त्या मुळे राजूर येथील लिंगायत समाजाने हे पाऊल उचलले आहे असे सांगितले जात आहे.

दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी जायभाये दाखल झाले आहेत.घटनास्थळी मोठा जमाव एकत्र आलेला आहे.वीरशैव समाजाच्या संघटनेचे नेते मनोहर धोंडे यांच्या सोबत प्रशासनाचे अधिकारी बोलत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here