मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम गाढवे हे घरापासून पहाटेच्या वेळी पायी चालत काळेवाडी बीआरटी मार्गाजवळून जात होते. काही अंतर चालल्यावर त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगामध्ये एक कार आली. या वेगात आलेल्या कारने गाढवे यांना जोरात धडक दिली. धडक दिल्यानंतर गाढवे हे ५ फूट हवेत उडाले. त्यानंतर जोरात रस्त्यावर जाऊन आपटले. यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
गाढवे यांना उडविल्यानंतर जवळच असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दखल केलं. त्यांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून त्यात भरधाव कारने त्यांना उडविल्याचे पाहायला मिळत आहे. कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.