नवी दिल्ली : तुमच्या वैयक्तिक गरज पूर्ण करण्यासाठी ग्राहकांकडे वैयक्तिक कर्जाचा पर्याय आहे आणि याला कर्जदारांकडून अधिक पसंती मिळते. मात्र, तुम्ही सोने तारण कर्जाद्वारे देखील आवश्यक इतका पैसा उभा करू शकतात. वैयक्तिक कर्जावर बँका २४ टक्क्यांपर्यंत प्रचंड व्याज आकारतात. तुमचे नियमित उत्पन्न असेल किंवा तुम्ही चांगल्या कंपनीत काम करत असाल तर हा व्याजदर कमी होईल. पण जर तुमचे नियमित उत्पन्न नसेल तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. याशिवाय तुम्हाला ते कर्ज मिळाले तरी त्याचा व्याजदर खूप जास्त असेल, पण जर तुमच्या घरात सोने ठेवले असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही गोल्ड लोन घेऊ शकता आणि ते देखील वैयक्तिक कर्जाच्या अर्ध्या व्याजदराने मिळेल.

गोल्ड लोन सर्वात सुरक्षित
सोन्यावरील कर्ज सर्वात सुरक्षित मानले असते, जे तुम्हाला तुमच्या सोन्याच्या दागिन्यांवर सुरक्षित मिळते. तुम्हाला अचानक पैशाची गरज पडल्यास तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने बँकेत तारण ठेवून तुम्ही कर्ज घेऊ शकता. त्याची प्रक्रिया देखील सोपी असून यामध्ये फारशा कागदपत्रांची गरज भासत नाही. या दरम्यान कोणत्या बँका सर्वात कमी व्याजदरात गोल्ड लोन देते याबद्दल जाणून घेणार आहोत. सोने कर्जावरील व्याजदर कर्जाची रक्कम आणि बँकेवर अवलंबून असते. तुम्हाला १८ ते २२ कॅरेटमधील सोन्याचे दागिने आणि बँकेने टाकलेल्या नाण्यांवर (५० ग्रॅमपर्यंत) सुवर्ण कर्ज मिळू शकते. दरम्यान, बँकेत सोने तारण ठेवल्यास तुम्हाला दोन फायदे मिळतात. पहिला म्हणजे सोने तारण कर्जामुळे बँकेत सोने सुरक्षित राहते आणि दुसरीकडे तुम्हाला रक्कमही उपलब्ध होते.

व्याजदर आणखी रडवणार.. महागड्या EMI चे चटके बसणार, अमेरिकेचा निर्णय भारताला महागात पडणारा
सोने कर्जावर मर्यादा
गोल्ड लोनची मर्यादा गर्भकांची गरज आणि बँकेनुसार वेगवेगळी असते. तारण ठेवलेल्या सोन्याचे वजन आणि शुद्धता यावर सुवर्ण कर्जाचे मूल्य ठरवले जाते. कोटक महिंद्रा बँकेनुसार तुमची कर्ज मर्यादा तुम्ही दिलेल्या सोन्याच्या मालमत्तेच्या मूल्याशी थेट प्रमाणात आहे. मात्र, बँकेनुसार एका वेळी ग्राहक/कुटुंब किंवा गटाला किमान २० हजार ते १.५ कोटी रुपयांचे कर्ज दिले जाऊ शकते. तसेच LTV म्हणजेच कर्ज ते मूल्य ६५-७५ टक्क्यांच्या श्रेणीत आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या सोन्याच्या किमतीच्या ७५% पर्यंत कर्ज मिळू शकते.

BoB बँकेची ग्राहकांना होळी भेट; घर खरेदी करणे स्वस्त झाले, वाचा काय आहेत नवे व्याजदर
सुवर्ण कर्जावरील बँकांचे व्याजदर

gold-loan-rates


कार लोनचे आता नो टेन्शन! लक्षात ठेवा २०-१०-४ फॉर्म्युला, हसत हसत कर्ज फिटेल
प्रक्रिया शुल्क
भारतीय स्टेट बँकचे (एसबीआय) गोल्ड लोनसाठी प्रक्रिया शुल्क ३१ मार्च २०२३ पर्यंत शून्य आहे. तर HDFC बँक आणि ICICI बँक वितरित रकमेच्या १% प्रक्रिया शुल्क आकारतात. तर बँक ऑफ बडोदाच्या 3 लाखांपर्यंतच्या सुवर्ण कर्जामध्ये प्रक्रिया शुल्क शून्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here