धुळे : धुळे शहरातील देवपुर भागात एका नामांकित महाविद्यालय परिसरातील चार कॅफेंसह एकूण सात कॅफेंवर आज दुपारी देवपूर पोलिसांनी अचानक धाड टाकली. यावेळी 15 तरुण, 15 तरुणी आणि 9 कॅफे चालक मालक अशा एकूण 39 जणांना देवपूर पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या कारवाई मुळे कॅफे चालक आणि धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या विविध कॅफेवर स्वतंत्र कॅबिन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी या कॅफेंचा गैरवापर करत असल्याचा धक्कादायक प्रकार धुळे शहरात आज उघडकीस आला आहे. या कॅफेमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या विद्यार्थ्यांना देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धुळे शहरात कॅफे मालकांचा देखील सुळसुळाट पाहायला मिळत आहे. या कॅफेमध्ये स्वतंत्र कॅबिनची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळेच तरुणाईला त्याची भुरळ पडत आहे. अनेक तरुण या ठिकाणी स्वतंत्र कॅबिनमध्ये अश्लील चाळे करत असल्याची तक्रार देवपूर पोलिसांना प्राप्त झाली होती, त्यासंदर्भात वरिष्ठांशी या कॅफेंवर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा करून सदरची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांनी दिली.

शर्यतीवेळी भरधाव बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली, दोघा वृद्धांचा मृत्यू, अलिबाग बीचवर घटना

देवपूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर लागलीच उपविभागीय पोलीस अधिकारी एस. ऋषिकेश रेड्डी यांनी देवपूर पोलीस ठाण्याला भेट देत सदर विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना देवपूर पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. यानंतर ऋषिकेश रेड्डी यांनी विद्यार्थ्यांना या संदर्भात कौन्सिलिंग करून त्यांना समज देण्यात आली, त्यानंतर त्यांच्या पालकांची एक स्वतंत्र बैठक घेत त्यांना देखील आपल्या पाल्यांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे म्हणून समज देऊन या सर्व विद्यार्थ्यांना सोडण्यात आले. मात्र कॅफे चालकांवर आम्ही कठोर कारवाई करणार असून यापुढे शहरातील सर्वच कॅफेंवर आमची करडी नजर असणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

उशीर झाला तरी घरी परतल्या नाहीत, शोधाशोधीनंतर लताबाई मृतावस्थेत आढळल्या, साताऱ्यात खळबळ
सदरची कारवाई देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोतीराम निकम, सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे, इंदवे साहेब, योगेश काचावे विजय जाधव, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, बंटी साळवे, प्रकाश थोरात चारुशीला शिरसाठी आदींच्या पथकाने ही कारवाई केल्याने एस. ऋषिकेश रेड्डी यांनी त्यांचे यावेळी कौतुक केले.

दुसरं विचारा ना, ते नका विचारू; व्हायरल व्हिडिओवर प्रश्न विचारतच गौतमी पाटीलची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here