जळगाव : जळगाव तालुक्यातील नशीराबाद येथे घरुन बेपत्ता असलेल्या एका प्रौढाचा मृतदेह बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातीलच एका शेतातील विहिरीत आढळून आला आहे. प्रमोद प्रल्हाद माळी (वय ४५ रा. वरची आळी, नशिराबाद ता.जि.जळगाव) असं मयताचं नाव आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील नशीराबाद येथे हेमा देवीदास बोंडे यांच्या मालकीचे शेत आहे. या शेतात सुनिल श्रावण मोरे हे रखलवालदार आहेत. सुनील मोरे हे बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विहिरीवर पाणी घेण्यासाठी आले. त्यावेळी मोरे यांना विहिरीत एका पुरूषाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आला. त्यांनी लागलीच शेत मालक हेमा बोंडे यांना घटनेची माहिती दिली. बोंडे यांच्यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळ गाठले. यावेळी गावातील रमेश माळी यांनी मयताची ओळख पटवली.

अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीकडून अटक, ४ तासांच्या चौकशीनंतर कारवाई
मयत हे रमेश माळी यांचे मेहूणे प्रल्हाद माळी असल्याचं समोर आलं आहे. माहिती मिळाल्यावर नशीराबाद पोलीस ठाण्याचे रवी तायडे, लीना लोखंडे, अलीयार खान, अतुल महाजन, यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करत आहेत.

मयत प्रमोद माळी यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. प्रमोद माळी एका कंत्राटदाराकडे कामाला होते. नगर जिल्ह्यात सध्या काम सुरु असल्याने १० ते १५ दिवसात एकदा प्रमोद माळी हे घरी यायचे. १५ दिवसांपूर्वीच माळी हे घरी आले होते. मंगळवारी सकाळी ६ वाजता घरात कुणाला काही एक न सांगता प्रमोद माळी हे घरातून बाहेर पडले.

रात्री उशीरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात प्रमोद माळी हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. तक्रार दिल्यानंतर शोध सुरु असताना काही तासांनी कुटुंबियांना थेट प्रमोद माळी यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. त्यानंतर त्यांच्या गावातील एका शेतातील विहिरीत मृतदेह आढळला. प्रमोद माळी यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

ऑस्ट्रेलियाच्या मॅचविनर खेळाडूची निवृत्ती, भारताच्या कसोटी मालिकेदरम्यान मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here