शासनाने यावर्षी कॉपीमुक्त अभियान राबविले असल्याने या प्रकारवर चाप बसवला गेला आहे. यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रचंड चिडले आहेत. चिडलेल्या विध्यार्थी व पालकांनी बुधवारी दिनांक ८ मार्चला नेहमी प्रमाणे कॉपी पुरविण्याचा प्रयत्न केला. परंतु केंद्रावरील पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला. यावरून विद्यार्थी व पालक यांनी परीक्षेचे काम करणाऱ्यांना शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना धमक्या देणे सुरू केले. या प्रकरणी सेवली येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच याबाबत एक तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे करून केंद्रावर वाढीव पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.
जि.प. प्रशाला सेवली ता. जालना येथील SSC व HSC परीक्षा केंद्रावर दि. ८ मार्च २०२३ ला कर्मचारी कार्यरत होते. परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्राबाहेरून चारही बाजूने मोठ्या संख्येने लोक परीक्षार्थीना कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने जमा झालेले होते. त्यांना विरोध केला असता व त्यांनी फेकलेल्या कॉप्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचू न दिल्याने व पर्यवेक्षकांनी कॉपी न करू दिल्याने पर्यवेक्षकांना व इतर शिक्षकांना कॉपी न करू दिल्यास व पोलीसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. शिवाय दगडफेक करून शांततामय वातावरणात परीक्षा घेण्यास बाधा निर्माण करत होते. त्यांच्या या कृत्यामुळे परीक्षा केंद्रावर कर्तव्य बजावणारा कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यांनी आपल्या जिवितासही धोका असल्याने यापुढे पुरेशी सुरक्षा न मिळाल्यास कर्तव्य बजावण्यास नकार दिला आहे. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.
बायका उघड्यावर शौचास बसायच्या,पाहवत नव्हतं; गावाची आई बनली, मंगळसूत्र, दागिन्यांसह जमीन विकून शौचालयं उभारली