मुंबई: विमेन्स प्रीमियर लीग जसजशी पुढे सरकत आहे, तसतशी अधिक रोमांचक होत आहे. आतापर्यंत या स्पर्धेत काही सर्वोत्तम खेळी पाहिल्या गेल्या आहेत परंतु पहिल्या शतकाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. ही प्रतीक्षा शुक्रवारी नक्कीच संपुष्टात आली असती जर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आणखी काही धावा केल्या असत्या कारण यूपी वॉरियर्सची कर्णधार अ‍ॅलिसा हिली तिच्या शतकापासून अवघ्या ४ धावा दूर होती.

शुक्रवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध युपी वॉरियर्स या सामन्यात पुन्हा एकदा आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीने आतापर्यंत सर्व सामने पराभूत होत त्यांनी पराभवाची हॅट्रिक केली आहे. स्टार खेळाडूंनी सजले असूनही आरसीबीला महिला प्रीमियर लीगचा एकही सामना जिंकता आलेला नाही. ब्रेब्रॉन स्टेडियमवर गुरुवारी रात्री स्मृती मानधनाच्या संघाला स्पर्धेतील सलग चौथा पराभव स्वीकारावा लागला.

IND vs AUS 4th Test LIVE: कुहनेमनने दिला भारताला मोठा धक्का, १०० धावांच्या आत भारताची पहिली विकेट

यावेळी यूपी वॉरियर्सने त्यांचा १० गडी राखून त्यांचा धुव्वा उडवला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीचा डाव १९.३ षटकात केवळ १३८ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात यूपी वॉरियर्सने १३ षटकात बिनबाद १३९ धावा करत सहज विजय नोंदवला. कर्णधार एलिस हिलीने ४७ चेंडूत नाबाद ९६ धावा केल्या तर देविका वैद्य ३१ चेंडूत ३६ धावा करून नाबाद परतली.

एलिसा हिलीने आरसीबीविरुद्ध स्फोटक खेळी खेळली आणि अवघ्या २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर हीली अधिकच आक्रमक झाली आणि तिने ४७ चेंडूत ९६ धावा केल्या. हिलीने आपल्या खेळीत १८ चौकार आणि १ षटकार लगावला. म्हणजे १९ चेंडूत ७८ धावा केल्या.

हेलीला डब्ल्यूपीएलमधील पहिले शतक झळकावण्याची संधी होती परंतु त्याआधी यूपी वॉरियर्सने ७ षटके बाकी असताना १३९ धावांचे लक्ष्य गाठले. १३व्या षटकातील पाचव्या चेंडूवर हीलीने चौकार मारून ९५ धावांपर्यंत मजल मारली. तेव्हा विजयासाठी फक्त १ धावेची गरज होती. हिलीने षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण तिला यश आले नाही आणि १ धाव घेऊन सामना संपवणे तिने योग्य समजले.

WPL 2023: मुंबईने दिल्लीवर मिळवला दणदणीत विजय, जाणून घ्या आता गुणतालिकेत कोणता संघ टॉपवर

शतक झळकावता आले नसले तरी डब्ल्यूपीएलमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम हिलीने आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाबाद ९० धावा करणाऱ्या आपल्याच संघाच्या ताहलिया मॅकग्राचा विक्रम मोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here