मुंबई: राज्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी मुंबईकरांना मात्र दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत जुलै महिन्यात सर्वाधिक रुग्णांनी करोनावर मात केली आहे. एकट्या जुलैमध्ये मुंबईत ४९ टक्के करोना मरीज बरे झाले आहेत. ही आजवरची सर्वात मोठी आकडेवारी असल्याने आरोग्य प्रशासनानेही सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. तर धारावीही करोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असून धारावीत फक्त ७२ रुग्ण उरले आहेत.

१ जुलै रोजी मुंबईत ७८ हजार ७०८ करोना रुग्ण होते. यापैकी ४४ हजार ७९१ रुग्ण बरे झाले आहेत. तर जुलैमध्ये २९ हजार २८८ अॅक्टिव्ह रुग्ण होते. त्यावेळी करोनाचा रिकव्हरी रेट ५७ टक्के होता. ३१ जुलैपर्यंत करोना रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार २७८ झाली. तर करोनाने बरे होणाऱ्यांची संख्या ८७ हजार ७४वर पोहोचली होती. अशा प्रकारे जुलैमध्ये करोनाचे ४२ हजार २८३ रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे जुलैमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४८.५६ टक्के एवढा आहे. या दरम्यान रिकव्हरी रेट ५७ ते ७७ टक्के एवढा आहे. करोनाचा दररोजचा ग्रोथ रेट १.६८ ते ०.९१ टक्के होता. डबलिंग रेट ४२ दिवसांवरून ७७ दिवस झाला. तर जुलैमध्ये करोनाचे ३५ हजार ५७० नवे रुग्ण सापडले आहेत.

जुलै महिन्यात करोनाचा रिकव्हरी रेट सुधारला. तसेच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार १ जुलैमध्ये मुंबईत २९ हजार २८८ अॅक्टिव्ह रुग्ण होते. ३१ जुलैपर्यंत ही संख्या ८७१९ ने कमी होऊन २० हजार ५६९ एवढी झाली. मात्र जुलै महिन्यातील डेट रेट अधिक होता. १ जुलैपर्यंत मुंबईत करोनामुळे ४ हजार ६२९ रुग्णांचा मृत्यू जाला होता. तर ३१ जुलैपर्यंत १ हजार ७२१ रुग्ण दगावले होते. त्यामुळे जुलैअखेरपर्यंत मृतांची संख्या ६३५०वर गेला होता. यात सर्वाधिक मृत्यू अंधेरी पूर्व येथे नोंदवले गेले. अंधेरी पूर्व येथे ४५५, धाराववीत ४३९ आणि कुर्ला, साकीनाका वॉर्डात ४०६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला.

धारावीत फक्त ७२ रुग्ण

एकेकाळी करोनाचा हॉटस्पॉट राहिलेल्या धारावीत फक्त ७२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. शनिवारी धारावीत केवळ ४ रुग्ण आढळून आले. धारावीत आतापर्यंत २५६० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २२३५ रुग्ण करोनावर मात देऊन घरी गेले आहेत, अशी माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी दिली. याच वॉर्डात दादरमध्ये एकूण १८०७ रुग्ण सापडले. त्यापैकी १२५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दादरमध्ये सध्या ४८२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर माहीममध्ये आतापर्यंत १७१८ रुग्ण सापडले असून त्यापैकी १४२२ रग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. माहीममध्ये सध्या २२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ,माहीम आणि दादरमध्ये ४३९ करोना रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here