राऊरकेला: स्ट्रायकर सुखजीत सिंगने दुसऱ्या सत्रात दोन गोल केल्यामुळे भारताने एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेच्या लढतीत शुक्रवारी जर्मनीवर ३-२ असा विजय मिळवला. वर्ल्ड कपमधील सुमार कामगिरीनंतर भारतीय संघ प्रथमच आंतरराष्ट्रीय लढतीस सामोरा गेला. जानेवारी महिन्यात वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा प्री क्वार्टरफायनलमध्ये पराभव झाला होता. त्या लढतीनंतरची टीम इंडियाची ही पहिलीच मॅच होती.

यंदा जानेवारीत पार पडलेल्या वर्ल्ड कपमध्ये यजमान भारताची कामगिरी निराशाजनक झाली होती. उपउपांत्य फेरीतूनच गाशा गुंडाळण्याची नामुष्की भारतावर आली होती. यामुळे ज्या अपयशी खेळाडूंना संघातून काढण्याची चर्चा सुरू होती. त्यात २६ वर्षीय सुखजीतचेही नाव होते. त्याने प्रो लीगच्या लढतीत मात्र सजगता दाखवत सफाईदार खेळ केला. सुखजीतने ३१ आणि ४२व्या मिनिटाला ‘फील्ड’ गोल करत भारताच्या विजयात ठसा उमटविला.

सध्या या लीगमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्त अव्वल असणारा भारताचा कर्णधार हरमनप्रीतसिंगने ३०व्या मिनिटाला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्याने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला. वर्ल्ड कपनंतर हरमनप्रीतच्या अपय़ाशावरही टीका झाली. मोठ्या स्पर्धांमध्ये कच खाणारा खेळाडू, अशा बोचरी शेरेबाजी हरमनप्रीतवर झाली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला धोका, त्यांना वेळीच आळा घाला नाही तर…; MCC म्हणते, सावध व्हा…!
शुक्रवारी सामन्याच्या ४२व्या मिनिटास भारत ३-० आघाडीवर होता. जर्मनीकडून पॉल फिलिप कॉफमन आणि मिचेल स्ट्रूथऑफ यांनी अनुक्रमे ४४ आणि ५७व्या मिनिटाला गोल केले.

भारताकडून झालेले गोल
सुखजीत सिंग- ३१ आणि ४२ व्या मिनिटाला
हरमनप्रीत सिंग- ३०व्या मिनिटाला

न्यूड होऊन मैदानात घुसणाऱ्या किन्से वॉलांस्कीचा नवा कांड; यावेळी शेअर केला व्हिडिओ
जर्मनीकडून झालेले गोल
पॉल फिलिप कॉफमन- ४४व्या मिनिटाला
मिचेल स्ट्रूथऑफ- ५७व्या मिनिटाला

सामन्यातील अखेरच्या टप्प्यात भारताने संरक्षणात्मक खेळ केला. तर जर्मनीने गोलकीपरला बाहेर करत एक अतिरिक्त खेळाडूचा समावेश केला. भारताला अखेरच्या क्षणी पेनल्टी स्ट्रोक मिळाली पण हरमनप्रीतला गोल करता आला नाही. भारताने ही मॅच ३-२ने जिंकली आणि ३ गुण मिळवले. आता टीम इंडियाची पुढील लढत रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तर जर्मनीविरुद्धच्या दुसऱ्या टप्प्यातील लढत सोमवारी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here