नाशिक : नाशिक म्हणजे प्रभू श्री रामचंद्राची पावनभूमी, धार्मिक वारसा लाभलेलं शहर, औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, पर्यटन, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर. एवढंच काय तर चलनी नोटांचा कारखाना, विमानांचा कारखाना, वाइनरी अशा अनेक गोष्टींचा समावेश असलेलं नाशिक शहर. आता या नाशिकचं नाव यवतमाळ येथील एका महिलेने आपल्या बाळाला दिलं आहे. महिलेनं आपल्या बाळाला गावाचं नाव कसं दिलं, आणि तेही यवतमाळमध्ये राहणाऱ्या महिलेनं? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे आणि याचं आश्चर्यही वाटतंय. पण हे खरं आहे. महिलेनं आपल्या बाळाचं नाव ‘नाशिक’ असं ठेवलं आहे.

मुंबईहून सुटलेली सेवाग्राम एक्सप्रेस नाशिककडे वेगाने निघाली होती. आणि या सेवाग्राम एक्स्प्रेसमधून यवतमाळमधील एक गर्भवती महिला प्रवास करत होती. नाशिकजवळ आलं होतं आणि यावेळी रेल्वेत असलेल्या महिलेला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. यावेळी रेल्वे डब्यात असलेल्या महिलांनी प्रसंगावधान दाखवत महिलेला धीर देण्याचा प्रयत्न केला. ती महिला प्रसूती वेदनेने अक्षरशः विव्हळत होती. अखेर नाशिकरोड रेल्वे स्टेशन क्रॉस झालं. त्यानंतर या महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला.

महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर विचारलं? आता कुठलं स्टेशन गेलं. तर यावेळी उपस्थित सर्वांनी सांगितलं, नाशिक रोड. म्हणून त्या महिलेनं आपल्या बाळाचं नाव ‘नाशिक’ ठेवलं. मुंबईहून सुटलेली रेल्वे नाशिकच्या रेल्वे टेशनवर आल्यानंतर रेल्वेत बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्म होताच महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला. मग या महिलेनं आनंदाच्या भरातच आपल्या बाळाचं नाव ‘नाशिक’ ठेवलं.

मुंबईहून निघालेल्या सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये महिलेला नाशिकरोड रेल्वे स्टेशन जसं जसं जवळ येऊ लागलं, तसं तसं प्रसूतीकळा येऊ लागल्या. या असह्य वेदना पाहून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या इतर महिलांचाही थरकाप झाला. परंतु सर्व महिलांनी यावेळी प्रसंगावधान दाखवलं. गर्भवती महिले भोवती गोळा झाल्या आणि नैसर्गिक प्रसूती होण्याची वाट पाहू लागल्या. या डब्यातील सर्वांच्या मनातील चलबिचल सुरू झाली आणि सर्वांचं लक्ष केंद्रीत झालं त्या असह्य वेदना देणाऱ्या प्रसूती कळा येऊ लागलेल्या महिलेकडे. महिलेची नैसर्गिक सुखरूप प्रसूती व्हावी, यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. तेवढ्यातच नाशिकरोड रेल्वे स्टेशन काही अंतर क्रॉस झालं आणि सेवाग्राम एक्सप्रेसच्या डब्यात टाळ्यांचा कडकडाट होऊन जल्लोष झाला. या महिलेनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. सेवाग्राम एक्सप्रेसच्या डब्यात असलेल्या सर्वांच्या लक्षात राहील असा ही अविस्मरणीय क्षण होता.

तोल गेला अन् CRPF जवान कुटुंबासह कालव्यात पडला, २० तासांनी मृतदेह सापडला…
बाळ जन्माला आलं की त्याचं बारसं करून नाव ठेवतात. यावेळी एक ना अनेक नावं मोठ्या हौसेने सुचवली जातात आणि अखेरीस सर्वांच्या आवडीचं नाव दिलं जात. तर अनेक जण नाव रास शोधण्यासाठी किंवा राशीनुसार असलेल्या अक्षरांवरून नाव ठेवतात. काही जण एखाद्या चित्रपटातील अभिनेता, अभिनेत्रीच्या असलेल्या नावावरून बाळाचं नाव ठेवतात. तर काही अर्थपूर्ण नाव ठेवत असतात. परंतु नाशिकच्या स्थानकावर रेल्वेत जन्मालेल्या बाळाचं नाव आईनं नाशिक ठेवलं आहे.

दहावीचा इंग्रजीचा पेपर, शाळेत लगबग; सुपरवायझिंगला आलेले सर एकाएकी कोसळले; नियती क्रूर झाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here