चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिसव्ही खेळाडू टी-ब्रेकनंतर जेव्हा पुन्हा खेळण्यासाठी मैदानावर जाण्यासाठी तयार होते. तेव्हा काही चाहत्यांनी सूर्या सूर्या असा आवाज देण्यास सुरुवात केली. सूर्याने हात दाखवत आणि हात जोडून अभिवादन केले. मग सूर्याने हात जोडतात अचानक सर्वांना प्रभू रामचंद्रांची आठवण झाली आणि सर्वांनी एकच स्वरात ‘जय श्री राम’ चा जयघोष सुरु केला. मग चाहत्यांना शमीची आठवण झाली आणि त्यांनी शमीचं नाव घेत जय श्री राम म्हणायला सुरुवात केली. इतरांसाठी आणि क्रीडाप्रेमींसाठी हे दृश्य खरंच राग आणणारे होते. मात्र शमीने शांत राहण्याचा निर्णय घेत त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष केले.
चौथ्या कसोटीचे अपडेट्स
रोहित आणि गिलने दुसऱ्या दिवशी भारताच्या डावाची चांगली सुरुवात केली. पहिल्या दहा षटकांत दोघांनी ३६ धावांची खेळी साकारली. तर दुसऱ्या दिवशीहि भारताला चांगली सुरुवात करून दिल्यांनतर रोहित शर्मा झेलबाद झाला. मात्र शुभमं गिल अजूनही मैदानात कायम आहे. त्याने आपले दमदार अर्धशतक झळकावले आहे आणि भारताने आपल्या १०० धावांचा पल्ला गाठला. तर पुजारा आणि गिलच्या जोडीवर टीम इंडियाची कमान आहे.