मुंबई : घाटकोपरमधील उच्चभ्रू सोसायटीमधील टीना आणि दीपक शहा या दाम्पत्याच्या गूढ मृत्यू प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. आता या तपासातून मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या बुधवारी या दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. आता पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी एक मोठी शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणी वैद्यकीय तपासणी सुरू असून त्याचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे.

मित्रांसोबत धुळवड खेळून आलेले टीना आणि दीपक शहा हे राहत्या घरातील बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळले होते. गेल्या आठवड्यात धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता शहा दाम्पत्य घरापासून दोनशे मीटर अंतरावर छेडानगर जंक्शनवर दिसून आलं होतं. मात्र, त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्यांचा काही ठावठिकाणा लागला नाही. या प्रकरणी पाच पथकं तयार करून पोलिसांनी तपास सुरू केला. दुसरीकडे त्यांच्या पोटातील पदार्थांचे आणि त्या ठिकाणी केलेल्या उलटीच्या नुमन्यांचे रासायनिक विश्लेषण करण्यात येत आहे. तसंच इमारतीमधील सर्व सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसंच मादक पर्थांतून विषबाधा झाल्याचा संशय आहे. भांग आणि अल्कोहोलमुळे विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दीपक शहा (वय ४४ ) आणि टीशा शहा (वय ३८) हे आपल्या घरातील बाथरूममध्ये मृत अवस्थेत आढळून आले होते. बाथरूममध्ये त्यांनी उलटी केलेली होती आणि गिझर सुरू होते. दीपक आणि टीना शहा हे विलेपार्लेमध्ये दुपारी ३.३० वाजेपर्यंत रंगपंचमी खेळत होते. त्यानंतर ते दोघं कुकरेजा टॉवरमधील आपल्या घरी ४.३० वाजता परतले होते.

मुंबईकर दाम्पत्य बाथरुममध्ये मृतावस्थेत, पाच शक्यता समोर, पण ‘त्या’ सहा तासांचं गूढ वाढलं
या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी माहिती दिली आहे. घरी आल्यानंतर या दोघांची धडपड सुरू झाल्याचं दिसून येतंय. त्यांच्या शरीरावर आणि कपड्यांवर रंगांचे डाग होते, असं पोलीस सूत्रांनी म्हटलं आहे. एकूण सर्व परिस्थिती बघता घरी आल्यानंतर काही वेळातच दोघांचा मृत्यू झाला असावा. त्यांचे मृतदेह उशिरा आढळून आले. जवळपास २० तास त्यांच्या मृतदेहावर शॉवरमधून सतत पाणी सुरू होते. यामुळे त्यांच्या शरीरावरची त्वचा जवळपास सोलवटून निघालेली होती, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

पोलिसांना पाहून यूटर्न, पुलाच्या कठड्याला धडकून थेट ४० फूट खाली, वांद्र्यात बाईकस्वार ठार
पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर दीपक शहा यांनी दुसरं लग्न केलं होतं. आणि दोन वर्षांपूर्वी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. यामुळे या प्रकरणी त्यांच्या पहिल्या पत्नीचीही चौकशी करण्यात येत आहे. तसंच या दोघांना तसंच रंगपंचमीसाठी बोलावणाऱ्यांचेही जबाब घेण्यात आले आहेत. याशिवाय गेल्या तीन महिन्यात आलेल्या आणि संशयास्पद वाटणाऱ्या ४५०० फोन कॉल्सची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here