छत्रगुण सोळुंके याने त्या खोलीची किल्ली चोरून त्या खोलीतून २४ जानेवारीला पहाटे ४.३६ ते ४.४६ वाजेदरम्यान गुटख्याच्या ५ गोण्या चोरून नेल्या. त्यानंतर ११ फेब्रुवारीला पहाटे ५.३० ते ५.४२ वाजे दरम्यान गोवा १ लाख ९० हजार रुपये किमतीच्या १९ गोण्या चोरून नेल्या, असा एकूण २ लाख ४० हजार रुपये किंमतीचा गुटखा चोरून नेल्याचे निष्पन्न झाल्यामुळे परवा रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी छत्रगुण सोळुंके याच्याविरोधात ४०६, ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार हे करीत आहेत.
हे जरी खरे असले तरी याप्रकरणात खरे आरोपी वेगळेच असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा गुटखा थेट माफियापर्यंत पोहोचविण्यात आल्याची चर्चा आहे. याप्रकरणातील आरोपी छत्रगुण सोळुंके हा गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्यात साफसफाई, चहापाणी देण्याबरोबरच मुक्कामी राहणाऱ्या पोलीस आणि आरोपींना जेवणाचे डब्बे देण्याचे काम करतो. तो जरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गुटखा काढून देताना दिसत असला तरी, त्याच्याजवळ गुटखा साठविलेल्या खोलीचा किल्ली कशी पोहोचली? या प्रश्नाची उकल आता पोलीस करत आहेत. तसेच गुटखा गायब प्रकरणात परतूर आणि सेलू येथील एका माफियाचा संबंध असण्याची जोरदार चर्चाही परतूर शहरात सुरू आहे.
गरज माणसाला काय करायला लावेल? कर्ज फेडण्यासाठी चक्क रस्त्याच्या बांधकामाचा जेसीबीच चोरला