डोंबिवली : शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील. अती उत्साही कार्यकर्त्यांना आवरा ! असा खोचक सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून डोंबिवली शहर शाखेबाहेर साकारण्यात आलेला देखावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘३५० वर्षानंतर .. पुन्हा तोच योग’ या आशयाच्या या देखाव्यात एका बाजूला भवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण सुपूर्द करताना देखाव्यात दाखवण्यात आलं आहे. यावरून आता मनसे आमदार पाटील यांनी ट्विट करत खोचक सल्ला दिला आहे.

रोहित शर्माने कानाखाली मारण्यासाठी हात उचलला होताच; चौथ्या कसोटीत नेमक काय झालं, Video
मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत सांगितले की, “कोणी स्वतःलाच ‘जाणता राजा’ म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं.अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील…

मुंबई इंडियन्सने टीम इंडियाला दिला आणखी एक सुपर स्टार; गोलंदाजी इतकी घातक की…

या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टॅग केलं आहे.अती उत्साही कार्यकर्त्यांना आवरा असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाचीतुलना करणं चूक असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमधून अधोरेखित केलं आहे.आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किव्हा शिवसेनेच्या नेत्यांकडून काय उत्तर येते हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here