बेंगळुरू: कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे ११० वर्षीय महिलेने कोविड-१९ वर आश्चर्यकारकरित्या मात केली. ही महिला पूर्ण बरा झाल्यानंतर तिला शनिवारी हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव सिद्धम्मा असे असून ती पोलिस क्वार्टर्समध्ये राहते. सिद्धम्मा यांना ५ मुले, १७ नातवंड आणि २२ पणतू आहेत. सिद्धम्मा यांना त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना २७ जुलैला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्या सर्वांना चित्रदुर्ग येथील कोविड-१९ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सिद्धम्मा आता पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत.

‘मी कोणालाही घाबरत नाही’

सिद्धम्मा यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्या अतिशय खंगल्या. ४ लोकांच्या मदतीने त्यांना बरे झाल्यानंतर रुग्णालाबाहेर आणण्यात आले. त्यावेळी रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सिद्धम्मा यांचे स्वागत केले. आपण करोना झाल्याचे कळल्यानंतर घाबरलात का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मात्र त्यावर आपण कोणालाही घाबरत नाही, असे उत्तर दिले. या रुग्णालयात माझ्यावर उत्तम उपचार केले गेले. तसेच रुग्णालयातील खाण्या-पिण्याची व्यवस्थाही उत्तम होती, असे सिद्धम्मा म्हणाल्या.

वाचा:

११० वर्षीय महिला करोनामुक्त होणे हा विक्रम

सिद्धम्मा या सर्वात वृद्ध महिला करोनावर मात करून करोनामुक्त झाल्या आहेत हे अतिशय अभिमानाचे आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी बसावाराजू यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. ११० वर्षीय महिलेचे करोनावर मात करणे हा एक विक्रमच असल्याचे ते म्हणाले. सिद्धम्मा या एका पोलिस कर्मचाऱ्याची आई असून त्या पोलिस क्वार्टर्समध्ये राहतात.

करोना या जागतिक साथीच्या आजाराचे सर्वाधिक बळी वयोवृद्ध व्यक्ती ठरतात असे जगभरात ज्ञात आहे. जगभरात करोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे वृद्ध व्यक्तींचेच आहे. अशात कर्नाटकातील सिद्धम्मा यांनी आपले वय ११० इतके असतानाही करोनावर मात केल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वाचा:
वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here