बर्लिन (जर्मनी) : तरुणपिढीमध्ये स्मार्चवॉच वापरण्याचे प्रमाण मोठे आहे. स्मार्चवॉचमध्ये अनेक उपयुर्क फीचर्स असल्याकारणाने तरुणांना स्मार्टवॉचचे विशेष आकर्षण आहे.स्मार्टवॉच हे स्टायलीश तर असतेच, पण त्यात फिटनेस ट्रॅकर, हार्ट रेट मॉनिटर अशा आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टींचा देखील समावेश असतो. मात्र, याच उपयुक्त स्मार्टवॉचमुळे काही वाईट मासनिक परिणाम देखील होऊ शकतात असा सावधगिरीचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. याचेच उदाहरण द्यायचे झाले तर एका तरुणाला याच स्मार्टवॉचने थेट रुग्णालयात पाठवले आहे.

हा तरुण स्विस-जर्मन तरुण आहे. या तरुणाला कोणताही आजार नव्हता. त्याने स्मार्टवॉच वापरायला सुरू केले. त्यानंतर हळूहळू त्याला तणावाचा सामना करावा लागला. याचे कारणही तसेच आहे. स्मार्टवॉचमुळे या तरुणाने आपल्या स्मार्टवॉचच्या इलेक्ट्रोकार्डिओग्रामवर सतत लक्ष ठेवायला सुरू केले. पुढे हळूहळू त्याला आपल्या छातीत दुखत असल्याचे वाटायला लागले. इतकेच नाही, तर त्याला आपल्या हृदयातील रक्तप्रवाहाची गती देखील कमी होत असल्याचे त्याला वाटू लागले. त्याची भिती वाढल्याने त्याने थेट रुग्णालयच गाठले.

सोलापुरात टोळक्याचा धुडगूस, लव जिहादच्या संशयावरून तरुणास बेदम मारहाण, तरुणीने दिला हा जबाब
रुग्णालयाने या तरुणाला दाखल करून घेतले. तेथे त्याच्या आवश्यक त्या चाचण्या घेण्यात आल्या. मात्र या तरुणाच्या स्मार्टवॉचमधील इलेक्ट्रोकार्डिओग्राम आणि १२ लीड इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी) हे अगदी समान आले आहे. याचाच अर्थ असा की या तरुणाच्या स्मार्टवॉचमधील अहवाल आणि ईसीजीचा अहवाल पूर्णपणे बरोबर होते. म्हणजेच तो तरुण ठणठणीत होता. त्याला हृदयाशी संबंधित कोणताही आजार, कोणतीही समस्या नव्हती. त्यानंतर तुला काहीच झालेलं नसल्याचं सांगत रुग्णालयाने या तरुणाला डिस्चार्ज दिला.

चंद्रकांतदादांची ती ऑफर, राजू शेट्टी यांनी दिला तातडीने नकार, दादांच्या प्रयत्नांना घातला खो
नेमके काय घडले?

त्याचे झाले असे की, डॅनिश फुटबॉलपटू क्रिश्चियन एरिक्सन याला एका सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. ते पाहून हा तरुण घाबरला. त्याने आपल्या हृदयाच्या आरोग्यावर लक्ष राहावं म्हणून स्मार्चवॉच खरेदी केले. तेव्हापासून त्याने सतत आपल्या हृदयाच्या आरोग्यावर लक्ष देणे सुरू केले. स्मार्टवॉचचा वापर कसा करावा यासाठी त्याने गुगल केले होते. स्मार्टवॉचमधील इलेक्ट्रोकार्डियोग्राममॉनिटरवर हार्ट ॲटॅक आल्याचे कसे कळते हे त्याने पाहिले.

ठाण्यात पुन्हा राडा; टाळे तोडून शाखेत घुसल्याचा आरोप, शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here