कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे जवाहर साखर कारखान्याच्या पूर्वेस असणाऱ्या दूधगंगा डाव्या कालव्यात एक जळालेली कार मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या जळालेल्या कारमध्ये एक मृतदेह देखील मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली असून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवारी सकाळी जवाहर साखर कारखान्याच्या पूर्वेस असणाऱ्या कालव्यात ४० फूट खोल एक कार पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने ही कार पाण्यातून बाहेर काढली. कारची तपासणी केली असता कारमध्ये जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडलं, अध्यक्ष होताच संजय पवार म्हणाले २० वर्षांनी न्याय मिळाला, तोही भाजप….
दरम्यान, पोलिसांनी कारच्या काचा फोडून मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, हा मृतदेह संपूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असून हा मृतदेह मोतीराम महादेव रजपूत यांचा असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं? याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी मृतदेह बॉडी तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये नेला असून हा नेमका अपघात होता की घातपात होता याचा तपास हुपरी पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, कालव्यात मिळालेली चारचाकी तिचा क्रमांक एम.एच १२ ईटी १७६२ असा असून ही गाडी कधी पाण्यात पडली? मृतदेह कधीचा आहे? या सर्व गोष्टींचा फॉरेन्सिक टीम तपास करत आहे. गेल्या चार महिन्यांपासून याच भागातील एक तरुण बेपत्ता असल्याचे देखील बोललं जात आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण येत असून पुढील तपास आता सुरू करण्यात आला आहे.

विहिरीच्या पाण्याचा वाद जीवावर बेतला, सांगलीत काका-पुतण्याची हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here