गावात सुमारे नवव्या शतकापासून नाथपंथीय धनगरांची वस्ती आहे. सोळाव्या शतकापासून भिंताडे, भोसले, पिसाळ, कदम आणि दाभाडे तसंच बारा बलुतेदार, अलुतेदार सर्व जाती-धर्माच्या लोकांची वस्ती बावधन भागात वाढत गेली, अशी शिवकालीन इतिहासावरून सांगता येईल. बावधन हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे. “काशिनाथाचे चांगभलं”च्या आरोळीच्या निनादात सर्व कार्यक्रम साजरे होतात. आज बावधन गावात विविध समाजाची मंडळी गुण्यागोविंदाने राहतात. सार्वजनिक आणि धार्मिक कार्यात सर्व लोक एकत्र समान भूमिकेतून सामील होतात. हा बगाडाचा उत्सव साजरा करत असताना बगाड उत्सवासाठी सर्व जबाबदारी सर्व जातीधर्मामध्ये विभागली आहे. सर्व मंडळी न चुकता आपली जबाबदारी पार पडत आहेत. हे या यात्रेच्या वर्षानुवर्ष सुंदर व्यवस्थापनाचे एक मूळ कारण आहे. बावधन गावाची बगाड यात्रा रंगपंचमी दिवशी रविवारी होत आहे.

​माघ पौर्णिमेला बगाड यात्रेचा प्रारंभ​

​माघ पौर्णिमेला बगाड यात्रेचा प्रारंभ​

माघ पौर्णिमेला बावधनमध्ये एक वेगळाच उत्साह पाहण्यास मिळतो. कारण या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बगाड यात्रेचा प्रारंभ होतो. यादिवशी धनगर बांधवांकडून काशिनाथाच्या चरणी मानाची घोंगडी अर्पण करतात. त्याचप्रमाणे गावकरी बगाडाच्या शिडासाठी लागणारे कळक तोडतात. यावेळी अबालवृद्ध कळक ओढण्यासाठी उपस्थित असतात. बावधन गावच्या बगाडासाठी वाघल्यासाठी लागणारी बाभळ चौधरवाडी गावातून आणली आहे. चौधरवाडी गावातील आबासो मारुती पिसाळ यांनी ही बाभळ आनंदाने नाथ साहेबांच्या चरणी अर्पण केली आहे. हे जरी चौधरवाडीत राहण्यास असले तरी त्यांचं मूळ गाव हे बावधन आहे.

बगाडाच्या गाड्यांमध्ये वाघाला​

बगाडाच्या गाड्यांमध्ये वाघाला​

बागडाच्या गाड्यावर मधला खांब उभा करण्यासाठी एक मोठं चौकोनी लाकूड असतं. त्यामध्ये उभा खांब बसवला जातो. बगाडाच्या गाड्यांमध्ये सर्वात मोठं आणि महत्त्वाचा भाग म्हणजे वाघाला! त्या लाकडाला वाघाला असं म्हटलं जातं. त्याला पुढच्या बाजूला वाघाच्या तोंडाचा आकार दिलेला असतो. बगाड म्हणजे साक्षात शंकर स्वरूप भैरवनाथाचा रथ! शंकराचं आसन व्याघ्रासन असतं म्हणून या रथावरील महत्त्वाच्या लाकडाला पुढच्या बाजूला वाघाचं तोंड कोरलेलं असतं. साक्षात शंकर स्वरूप भैरवनाथ या व्याघ्रासनावर बसून येतात, अशी लोकांची मान्यता आहे.

बगाड्या होण्याचा मान

बगाड्या होण्याचा मान

यावर्षी बावधन बगाड यात्रेचा “बगाड्या” होण्याचा मान श्री. दिलीप शंकर दाभाडे यांना मिळाला आहे. भावाच्या मृत्यूनंतर गेली २० वर्ष दिलीप हे नाथांच्या कौलासाठी बसत होते. यंदा २०२३ साली त्यांना बावधनच्या बगाड यात्रेचा मानाचा “बगाड्या” होण्याचा मान मिळाला आहे.

बगाडाची सर्व लाकडं​

बगाडाची सर्व लाकडं​

धुलीवंदनाच्या दिवशी गावातील भोई समाजातील युवक ग्रामस्थांच्या मदतीने गावच्या थोरल्या विहिरीत वर्षभर ठेवलेली बगाडाची सर्व लाकडं पाण्यात बुडी देऊन बाहेर काढतात. हे सर्व लाकडी ही बाभळीची असतात. बाभळीचा चिवटपणा हा गुणधर्म कायम राहावा यासाठी ही लाकडे थोरल्या विहिरीत ठेवली जातात. सुतार मंडळी या लाकडांची पाहणी करून जुने-नवे लागणारे बगाडाचे भाग तयार करतात.

बावधन यात्रा – बगाड ओढण्यासाठी बारा बैलाची जोडी​

बावधन यात्रा - बगाड ओढण्यासाठी बारा बैलाची जोडी​

जोगूबाई यांचा विवाह सोहळा. विवाहातील मुख्य विधी म्हणजेच हळद. या दिवशी हा हळदी समारंभ गावातील सुवासिनीच्या हस्ते केला जातो. यावेळी नाथाला हळद लावली जाते. त्याचप्रमाणे गावातील बारा बलुतेदार आणि मानाच्या सुहासिनी देवाला हळद लावतात. याच दिवशी मानाचे पान लागलेला नाभिक समाजबांधव दिवटीचे धारदार टोक मनगटावर टोचतात आणि काठ्या नाचवत मंदिरात आणतात. प्रतिवर्षी गावचे लोहार एक मानाचा नाल मंदिरातील खांबाला ठोकतात. बगाडाच्या आदल्या दिवशी छबिना, पालखीचे मिरवणूक व बगाड बांधण्यात येते. हे बगाड पहाटे सोमेश्वरच्या दिशेने निघते. तेथे बगाड बगाड्याचा मान असणारे मानकरी यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन बगाडाला प्रारंभ होतो. यावेळी बगाड ओढण्यासाठी बारा बैलाची जोडी जुंपन्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here