चंद्रपूर: मुलीच्या पोटात सारखं दुखत असतं म्हणून तिची आई तिला रुग्णालयात घेऊन गेली. तिथे, डॉक्टरांनी तिला तपासलं आणि ही १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं सांगितलं. आपली अल्पवयीन मुलगी ही गर्भवती असल्याचं ऐकताच तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत याप्रकरणातील आरोपी लोकेश चुदरी (वय १९) याला अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील मुल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोंभुर्णा तालुक्यातील जुनगावं येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून ती नवव्या वर्गात शिकते.

चिमुरडा खेळता-खेळता घरी आला, आईला बघून ओरडतच सुटला, हादरवणारं दृश्य पाहून शेजारी घाबरले
पोट दुखीचा त्रास, आईला कळेना काय झालंय

नवव्या वर्गात शिकणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या काही दिवसांपासून पोट दुखीचा त्रास होत होता. मुलीला काय झालंय आईला काही कळेना. अखेर आईने तिला प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबाळ येथे तपासणीसाठी नेलं. तेव्हा वैद्यकीय तपासणीत ही अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं आढळून आलं.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकाला ताब्यात घेतलं

१५ वर्षांची अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे बघून डॉक्टरही हादरले. याबाबत त्यांनी कुटुंबियांना आणि मुल पोलिसांना माहिती दिली. मुल पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ कारवाई केली. मुलीच्या जबाबावरुन जुनगाव येथील लोकेश चुदरी याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर पोस्को कायाद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लग्नाची सगळी तयारी तशीच, हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू, आनंदोत्सवाऐवजी लग्नघरी शोककळा
काय आहे पोस्को कायदा?

पोस्को कायाद्याअंतर्गत लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण केले जाते. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने २०१२ रोजी लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा लागू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here