मुंबई : सलामीला येऊन प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या चिंधड्या उडवायच्या, पॉवरप्लेमध्ये बक्कळ धावा जमवायच्या, कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा फटकवायच्या, अशा अनेक कारणांसाठी के. एल. राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे तर कसोटीत सलामीला येऊन चांगल्या चेंडूला सन्मान देतानाच खराब चेंडूवर प्रहार करण्यासाठीही राहुलची ओलख आहे. के.एल. राहुलने अनेक अविस्मरणीय खेळी केल्यात. त्याचे फटके नजाकतीने भरलेले असतात. तो ऑनसाईडला एवढा फरफेक्ट खेळतो की क्षेत्ररक्षकांच्या बाहुगर्दीतूनही चेंडू अलगद सीमारेषेपार जाऊन धडकतो. पण त्याच राहुलची कसोटी कारकीर्द आता धोक्यात आलीये.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत कर्णधार रोहित शर्माने सलामीवीर म्हणून राहुलला संधी दिली पण त्याचा अपयशाचा सिलसिला सुरुच राहिला. दोन्ही कसोटीत त्याला आपला करिश्मा दाखवता आला नसल्याने त्याच्या कसोटी क्रिकेट खेळण्यावर प्रेक्षक प्रश्नचिन्ह उपस्थित करतायेत. बीसीसीआयने देखील उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली तेव्हा राहुलला संघातून वगळलं. त्याच्या जागी शुभमन गिलला संधी दिली आणि त्याने त्याच संधीचं सोनं केलं.

आईचं निधन, पोरांचा धार्मिक विधीला नकार, वृक्षारोपण करुन राख शेतात टाकली, गावातल्या मुलींच्या नावे फिक्स डिपॉझिट
केएल राहुलच्या जागी २३ वर्षीय सलामीवीर शुभमन गिलचा संघात समावेश करण्यात आला. गिलनेही कर्णधार रोहितचा विश्वास सार्थ करुन दाखवत अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात १२८ धावा ठोकल्या. गिलने २३५ चेंडूंच्या संयमी खेळीत १२ चौकार आणि १ षटकार लगावला. शुभमन गिल ज्या फॉर्ममध्ये सध्या खेळत आहे, ते पाहता आगामी कसोटी सामन्यांमध्येही त्याला संधी देण्यात येईल.

मतं फोडली, अध्यक्षपद खेचून आणलं, ‘किंगमेकर’ कर्डिलेंना फडणवीसांकडून शाबासकीची थाप
केएल राहुलला वारंवार संधी देऊनही तो अपयशी ठरतो आहे. आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात त्याला अपयश येतंय. राहुलकडे भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी होती. ती जबाबदारीही यावेळी काढून घेण्यात आली. त्याच्याजागी रोहितने शुभमन गिलला संघात जागा दिली अन् त्याने धमाका केला. शुभमनच्या कामगिरीत सातत्य आहे. राहुलच्या जागेवर आगामी काळात शुभमनला संधी जाऊ शकते. त्यामुळे राहुलची कसोटी कारकीर्द धोक्यात आल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here