veteran theater critic, ज्येष्ट नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन – veteran theater critic kamlakar nadkarni passed away in mumbai
मुंबई : धो धो बरसणाऱ्या पावसासारखी नाट्य समीक्षा लिहिणारे, नाट्यवेडे अशी सार्थ ओळख असलेले ज्येष्ट नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे मुंबईत निधन झाले. कमलाकर नाडकर्णी गेली पन्नास वर्षे नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत शेकडो नाटकांवर लिखाण केले आहे.
सुरुवातीच्या वर्षात ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात ते नाट्यसमीक्षा लिहीत असत. त्यांना उत्कृष्ट नाट्यपरीक्षक म्हणून सहा मानाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. नाडकर्णी यांनी महानगरी नाटक, राजा छत्रपती (बालनाट्य), नाटकी नाटक ही पुस्तके लिहिली आहेत. नाट्यसमीक्षेसह कमलाकर हे सुरुवातीच्या वर्षांमध्ये सुधा करमरकर यांच्या बालनाट्य संस्थेत पंधरा वर्षे लेखक, दिग्दर्शक व कलावंत म्हणून कार्यरत होते. एखाद्या लोकप्रिय कामगार नेत्याच्या भाषणासारखी त्यांची लेखनशैली आहे; असे नाट्यसृष्टीत त्यांच्या लेखनाविषयी म्हंटले जायचे. नाट्य संहिता वाचून, तिच्यातले बारकावे काढून, प्रयोगाच्या मर्यादा दाखवत ते नाट्यसमीक्षा लिहायचे. शासकीय दवाखान्यातील डॉक्टरला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, कारण जाणून तुम्हाला कीव करावीशी वाटेल त्यांच्या परीक्षणांची शीर्षकं हा त्यांचा यूएसपी होता. आयएनटीच्या ‘अबक दुबक तिबक’ नाटकाला ‘धबक धबक धबक’ असे शीर्षक देऊन त्यांनी त्या नाटकाची पिसे काढली होती. अमोल पालेकरांच्या ‘राशोमान’ला त्यांनी ‘ठुंग फुस्स’ असे शीर्षक दिले होते (कारण मूळ कलाकृती जपानी होती.) रत्नाकर मतकरींनी लिहिलेल्या ‘माझं काय चुकलं?’ या नाटकाचं हेडिंग होतं, ‘तेच तर सांगतो’, म्हणजे काय ते समजून जायचं. श्री. ना. पेंडशांच्या ‘रथचक्र’ नाटकात मूळ कादंबरीची खोली कशी नाही हे त्यांनी तौलनिक दाखले देत मांडले होते.
स्मार्टवॉचच्या वापराने तरुणाला थेट पोहोचवले रुग्णालयात, असे कसे घडले हे जाणून घ्या ‘चंद्रलेखा’च्या ‘स्वामी’ नाटकाचं त्यांनी ‘शनिवारवाड्याचा स्वामी’ आणि ‘रविवारवाड्याचा स्वामी’ असं दोन भागांत परीक्षण लिहिले होते. नाडकर्णींच्या तावडीतून कितीही मोठा लेखक, दिग्दर्शक, नट असला तरी तो सुटत नसे. कानेटकर, तेंडुलकरांनाही त्यांनी सोडलं नाही. त्यामुळे नाडकर्णींच्या नावाला एक वलय प्राप्त झाले आणि पुढे ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रुजू झाले.
यापूर्वी नाडकर्णी यांनी वृत्तपत्रीय समीक्षा कधी केली नाही. इथे त्यांना साप्ताहिकासारखी जागा नव्हती. पण त्यांनी आपली हूण आक्रमकांसारखी मुसंडी मारत लिहिण्याची वृत्ती सोडली नाही. त्यांनी आजवर शेकडो नाटकांवर लिखाण केले आहे. नाडकर्णींना अ. भा. मराठी नाट्य परिषदेने २०१९ सालचा जीवन गौरव सन्मान देऊन त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान केला होता. सोलापुरात टोळक्याचा धुडगूस, लव जिहादच्या संशयावरून तरुणास बेदम मारहाण, तरुणीने दिला हा जबाब