म. टा. प्रतिनिधी, : चार महिन्याचे भाडे थकल्याच्या कारणातून भाडेकरूला घरमालक व त्याच्या कुटुंबियांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना केशवनगर परिसरात घडली. या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात घरमालकाच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रोशन सुरेश पराते (वय २६) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार देवेंद्र सुरेश भाट, नर्गिस भाट, सरेश भाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार त्यांची आई आणि भावासह केशवनगर परिसरात भाट यांच्या घरात चार ते पाच वर्षांपासून भाड्याने राहत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांत लॉकडाउनमुळे त्यांचे चार महिन्यांचे घरभाडे आणि वीजबिल असे १४ हजार रुपये थकित होते. यावरून तक्रारदार आणि घरमालक यांच्यात वाद झाले होते. त्यातून आरोपींनी सिमेंटच्या ठोकळ्याने तक्रारदारास जबर मारहाण केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान गुरव करत आहेत.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे काहींना भाडे देणे जमलेले नाही. सरकारने तीन महिने भाडे घेण्यास सक्ती करू नये, असे आवाहन करूनही भाड्यावरून वादावादीचे प्रकार घडले होते. आता तर थेट झाल्याची घटना घडली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here