गांधीनगर: गुजरातच्या पाटणमधील एका खासगी नशामुक्ती केंद्रात तरुणाची हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. हार्दिक सुधार नावाच्या २५ वर्षीय तरुणाची नशामुक्ती केंद्रात १७ फेब्रुवारीला हत्या करण्यात आली. केंद्राच्या व्यवस्थापकासह इतर आरोपींनी तरुणाचा मृतदेह त्याच रात्री एका स्मशानात जाळला. यानंतर नशामुक्ती केंद्रानं तरुणाच्या काकांना फोन करून तरुणाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं सांगितलं. पोलीस उपायुक्त के. के. पांड्या यांनी हा घटनाक्रम सांगितला.

पोलिसांनी या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जयोना नशामुक्ती केंद्र आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. यावेळी त्यांना काही जण सुथारला निर्दयीपणे मारहाण करत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी ८ मार्चला एफआयआर दाखल करून भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ आणि २०१ नुसार आठ जणांना अटक केल्याची माहिती पांड्या यांनी दिली.
आयुष्य संपवतोय! तरुणाची FB पोस्ट नातेवाईकानं पाहिली, पोलिसांना कळवलं अन् खून उघडकीस
नशामुक्ती केंद्रात असलेला सुथार ६ महिन्यांपासून घरी जाण्याचा हट्ट करत होता. त्यामुळे केंद्राचे व्यवस्थापक त्रासले होते, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली. ‘१७ फेब्रुवारीला सुथार स्नानगृहात गेला. तिथे त्यानं हाताची नस कापून घेतली. त्यामुळे व्यवस्थापक संदीप पटेल संतापले. सुथारला धडा शिकवण्यासाठी पटेल यांनी प्लास्टिकच्या पाईपनं त्याला मारहाण सुरू केली,’ असं स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक आर. के. अमीन यांनी सांगितलं.
धुळवडीत डीजेच्या तालावर ठेका; नाचता नाचता फोटोग्राफर कोसळला, स्वत:ला सावरत घरी गेला, पण…
कोणालाही शंका येऊ नये म्हणून आरोपी सुथारच्या काकांशी खोटं बोलले. रक्तदाब कमी झाल्यानं सुथारचा मृतदेह मृत्यू झाला. त्याच्यावर रात्री उशिरा स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची खोटी माहिती नशामुक्ती केंद्राकडून सुथारच्या परिवाराला देण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here