Congress News : राज्यसभेत (Rajya Sabha) काँग्रेसनं व्हीप म्हणून खासदार रजनीताई पाटील ( Congress MP Rajni Patil) यांची नियुक्ती केली आहे. तर उत्तर प्रदेशातील आपले ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी (Pramod Tiwari) यांची राज्यसभेतील उपनेतेपदी निवड करण्या आली आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश ( Jairam Ramesh) यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे. बजेट अधिवेशनामध्ये निलंबनाची कारवाई झालेल्या रजनीताई पाटील यांची काँग्रेस कडून व्हीप  म्हणून नियुक्ती अर्थसंकल्पीय अधिवेशनात रजनीताई पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर आता पाटील यांच्यावर काँग्रेसनं मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Mallikarjun Kharge : राज्यसभा गटनेतेपदी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे कायम

राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते म्हणून प्रमोद तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. याआधी हे पद आनंद शर्मा यांच्याकडे होते. तर राज्यसभा गटनेतेपदी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेच तूर्तास कायम आहेत. काँग्रेसमध्ये अध्यक्षपद  मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आल्यानंतर राज्यसभेतला गटनेता बदलला जाईल, अशी चर्चा होती. पण तूर्तास तो बदल झाला नाही. 

 

जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय? 

काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी प्रमोद तिवारी यांची राज्यसभेतील पक्षाचे उपनेतेपदी आणि रजनी पाटील यांची व्हिप म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष (Jagdeep Dhankhar) यांना या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पक्षाचे नेते म्हणजेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. 

आनंद शर्मा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्याने पक्षाकडे उपनेते नव्हते. त्यामुळं आता उत्तर प्रदेशचे प्रमोद तिवारी यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते राजस्थानचे राज्यसभा सदस्य आहेत. महाराष्ट्राच्या असलेल्या रजनी पाटील या त्यांच्याच राज्यातून राज्यसभेच्या सदस्य आहेत. 13 मार्चपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या दोन दिवस आधी काँग्रेसनं (Congress) या नियुक्त्या केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Rajni Patil : सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम, खासदार रजनी पाटील यांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here