सातारा: माण तालुक्यातील सातारा- पंढरपूर रोडवरील लोधावडेनजीक हुंडाई क्रेटा आणि स्विफ्टची समोरासमोर धडक झाली. या अपघातातून बचावलेल्या सुभाष नरळे यांनी अपघाताचा थरार सांगितला आहे. सुभाष नरळे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. “मी दहा मिनिटे गाडीत बेशुद्ध होतो. मला काहीच कळालं नाही, नेमकं काय झालं. त्यावेळी शुद्धीवर आलो.तेव्हा पहिल्यांदा गाडी बंद केली. उजव्या दरवाजातून बाहेर येता येत नव्हते,तर मग मी डाव्या दरवाज्यातून बाहेर आलो” असं सुभाष नरळे यांनी सांगितलं.

याबाबत माहिती अशी की, सातारा-पंढरपूर हायवेवर म्हसवड होऊन सातारा या दिशेने जात असताना हुंडाई क्रेटा (एम. एच. ४२बी.बी.७६०१) लोधावडे ता. माण गावच्या नजीक समोरून भरधाव वेगाने आलेली स्विफ्ट डिझायर (एम. एच. ४२ए.डी.१५५४) या दोन्ही गाडीचे समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातामध्ये क्रेटा गाडीमध्ये असलेले सुभाष काकासो नरळे (वय ४७) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दहिवडी या ठिकाणी नेण्यात आले आहे.

IND vs AUS 4th Test LIVE: भारताच्या ३०० धावा पूर्ण, कोहली-जडेजाची जोडी मैदानात

स्विफ्ट डिझायर गाडीचा चालक भरधाव वेगाने चुकीच्या बाजूनं वाहन चालवत असल्याने दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. वाहन चालक त्या ठिकाणाहून पळून केला असल्याने त्याच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी.जी. हंगे करत आहेत.

माझ्या पतीनं ‘त्या’ १५ कोटींसाठी सतीश कौशिक यांना संपवलं; महिलेच्या दाव्यानं खळबळ

सुभाष नरळे हे पर्यंती गावचे रहिवासी आहेत पर्यंती प्राथमिक शाळेचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते सातारा येथे निघाले होते त्यावेळी त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातातून बचावलेल्या सुभाष नरळे यांनी घडलेल्या घटनेची माहिती सांगितली. “मी म्हसवडवरून साताराकडे निघालो होतो. समोरून गाडी येऊन माझ्या गाडीला धडकली. यादरम्यान मी दहा मिनिटे गाडीत बेशुद्ध होतो. मला काहीच कळालं नाही, नेमकं काय झालं. त्यावेळी शुद्धीवर आलो.तेव्हा पहिल्यांदा गाडी बंद केली. उजव्या दरवाजातून बाहेर येता येत नव्हते,तर मग मी डाव्या दरवाज्यातून बाहेर आलो. बाहेर आलो, तर दुसरी गाडी रस्त्यावर आडवी झालेली होती. त्या गाडीतील दोघेजण रानात जाताना मला दिसले.” असं सुभाष नरळे म्हणाले.

उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, मालेगावमधील सभेपूर्वी अद्वय हिरेंवर मोठी जबाबदारी, दादा भुसेंचं टेन्शन वाढणार?

कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा संताप, थेट केंद्रीय मंत्र्यालाच घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here