नवी दिल्ली: बुरा ना मानो होली है म्हणत नवी दिल्लीत एका टोळक्यानं जपानी तरुणीला जबरदस्तीनं रंग फासला. तिच्यासोबत गैरवर्तन केलं. ती नको नको म्हणत असताना तिला पकडून रंग लावण्यात आला. अखेर तिनं एका तरुणाच्या कानशिलात दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तरुणीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. पीडित तरुणीनं शनिवारी या प्रकरणी ट्विट केलं. आपल्या व्हिडीओमुळे ज्यांना वाईट वाटलं, ज्यांच्या भावना दुखावल्या, त्यांची मी माफी मागते. होळीच्या दिवशी जे काही झालं, त्यानंतरही मी भारतावर प्रेम करते, असं तरुणीनं ट्विटमधून सांगितलं.

तरुणीनं स्वत: पोस्ट केला होता व्हिडीओ
होळीचा व्हिडीओ मी स्वत: पोस्ट केला होता. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानं मी घाबरले. त्यामुळे मी व्हिडीओ डिलीट केला. या व्हिडीओमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या, त्यांची मी प्रामाणिकपणे माफी मागते, असं पीडित तरुणीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. होळीच्या दरम्यान कोणत्याही महिलेनं घराबाहेर पडणं धोकादायक असतं, असं मी ऐकलं होतं. ज्यावेळी माझ्यासोबत गैरवर्तन झालं, तेव्हा मी ३५ मित्रमैत्रिणींसोबत होते. मला जबरदस्तीनं रंग लावण्यात आला. त्यावेळी माझ्या एका जपानी मित्रानं चुकून तो व्हिडीओ चित्रित केला. होळीबद्दल कोणताही नकारात्मक संदेश देण्याचा माझा हेतू नव्हता, असं तरुणीनं म्हटलं आहे.
माझ्या पतीनं ‘त्या’ १५ कोटींसाठी सतीश कौशिक यांना संपवलं; महिलेच्या दाव्यानं खळबळ
तरुणी म्हणते, भारत एक अद्भुत देश
वास्तविक पाहता होळी हा एक अद्भुत आणि मजेदार कौटुंबिक सण आहे. एकमेकांना रंग लावून वसंताच्या आगमनाचं स्वागत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानं अनेकांना चिंता व्यक्त केली. त्यांची मी प्रामाणिकपणे माफी मागते. भारताबद्दलचे सकारात्मक पैलू सांगणं हाच माझा हेतू होता, असं तरुणीनं म्हटलं.
नशामुक्ती केंद्रात तरुणाला बेदम मारलं; एका हट्टानं जीव गेला; रातोरात गुपचूप अंत्यविधी, पण…
अनेकदा भारतात आलेय
भारताबद्दलची प्रत्येक बाब मला आवडते आणि मी अनेकदा भारतात आले आहे, असं तरुणी म्हणाली. तिनं पोलिसांच्या कारवाईविषयी विश्वास व्यक्त केला. ‘भारत एक अद्भुत देश आहे. इथे एखादी अशी एखादी घटना घडली तरीही आपण देशाचा द्वेष करू शकत नाही,’ असं मत तिनं व्यक्त केलं. दिल्लीच्या पहाडगंजमध्ये तरुणांच्या एका टोळक्यानं तरुणीसोबत गैरवर्तन केलं होतं. त्या घटनेचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये टोळकं तरुणीच्या डोक्यावर अंडंही फोडताना दिसत आहे. तरुणी नको नको म्हणत असतानाही तरुणांनी तिला जबरदस्तीनं रंग फासला.

तुम्ही गद्दारांसोबत जायला नको होतं, ग्रामपंचायतीचं उदाहरण देत बच्चू कडूंनी काढली शेतकऱ्याची समजूत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here