husband wife death, आयुष्यभराची साथ सोडली सोबतच, पत्नीच्या मृत्यूनंतर पाच तासांनी पतीने सोडले प्राण – the husband died five hours after his wife’s death in jalna
जालनाः ६० वर्ष सुखा समाधानाचा संसार केला. नातवंड, पतवंड पाहिली, सारी दुनियादारी पाहिली, आता देवाचं नाव घ्यायचं आणि सुखाने डोळे मिटायचे या विचाराने एका दाम्पत्याला मरणही एकाचवेळी आलं. ७५ वर्षांची पत्नी वृध्दापकाळाने स्वर्गवासी झाल्यानंतर पतीने देखील पाच तासानंतर प्राण सोडल्याची घटना जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील कोपार्डा येथे घडली आहे.
आयुष्यभर सावली सारख्या सोबत असलेल्या पत्नी यशोदाबाई सुपडू ढोले (७५) यांचे परवा शुक्रवारी दि.१० मार्च रोजी दुपारी २ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पाच तासाने पती सुपडू ढोले (८०) यांचेही निधन झाले. सुपडू ढोले यांच्या पत्नी यशोदाबाई यांची वृध्दापकाळातील अल्पशा आजाराने प्रकृती बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेले होते. परंतु दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच रस्त्यातच यशोदाबाई यांची प्राणज्योत मालवली. सुपडु ढोले यांना देखील वयोमानानुसार दम्याचा त्रास होत असल्याने त्यांनाही उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले होते. लेकीला भेटण्यासाठी घरातून निघाले, मात्र भेट झालीच नाही; पती-पत्नीसोबत घडलं अघटित त्यानंतर नातेवाईकांनी सुपडु ढोले यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांनाही घरी आणले. मात्र आपली पत्नी आपल्याला सोडुन गेल्याचे अतीव दुःख त्यांना झाले असल्याने सायंकाळी सुपडु ढोले यांनीही आपले प्राण सोडले. या घटनेमुळे गावात मोठा शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान कोपर्डा येथे दोघांवर काल शनिवारी दि.११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अत्यंसंस्कार करण्यात आले.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.