नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील सीमेवरील हिंसक घटनेनंतर निर्माण झालेल्या भारत-चीन ताणावाच्या () पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री (S Jaishankar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. चीनचा मुकाबला करण्यासाठी आम्हाला तयार रहावे लागेल, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे हे वक्तव्य चीनसोबतच्या ५ व्या फेरीतील चर्चेपूर्वी आले आहे. भारत-चीनही नियोजित चर्चा यापूर्वी रद्द करण्यात आली होती. मात्र, आज ही बैठक होत आहे. (we must stand up against china says foreign minister )

चीन या देशासोबत समतोल गाठणे हे सोपे काम नसल्याचे जयशंकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी भारत-चीन तणावाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले आहे. भारताला चीनचा आता विरोध करावा लागणार असून आता मुकाबल्यासाठी उभे राहावेच लागेल, असे जयशंकर म्हणाले.

ज्या प्रकारे चीन सीमेवर कारवाया करत आहे, त्या पाहता त्याचा व्यापारावर देखील मोठा परिणाम होईल हे निश्चित, असेही जयशंकर यांनी चीनला संदेश देताना म्हटले आहे. लडाखपूर्व मधील भारत-चीनदरम्यानची स्थिती आणि दोन्ही देशांचे संबंध हे दोन विषय वेगळे ठेवून विचार करताच येणार नाही आणि हे सत्य आहे, असेही जयशंकर म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here