दिवा: शुक्रवारी सकाळी स्फोटाच्या धक्क्याने शिळफाटा परिसर हादरला होता. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी आहे. शनिवारी सकाळी आगीवरील नियंत्रणानंतर वास्तव तपासण्यासाठी बीपीसीएल कंपनीकडून सुरुवात करण्यात आली असता यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्रूड ऑइलची टॅपिंगद्वारे चोरी होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या ऑइल चोराचा शोध घेण्याचं आव्हान शासकीय यंत्रणांसमोर असणार आहे. भूमिगत बीपीसीएल पाइपलाइनच्या गळतीमुळे पुन्हा आगीचे सत्र सुरू झाले आहे. या परिसरात धूर येत असून ज्या ठिकाणी बीपीसीएल (मुंबई-मनमाड जाणारी, १८ इंची वाहिनी) खोदल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी द्रव बाहेर आल्याने आग लागत आहे.

शुक्रवारी सकाळी लागलेल्या आगीचे कारण समोर आले नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अपयश येत होते. मात्र त्याच भागातून पाईपलाईन गेल्याचे समाजातच बीपीसीएल कंपनीकडून ऑइल पुरवठा बंद करण्यात आल्यानंतर आग शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणण्यात आली. आग आटोक्यात आल्यानंतर आगीची तीव्रता अधिक असलेल्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू केल्यानंतर पाईपलाईनला टॅपिंग केल्याचे समोर आले आहे. टॅपिंग केलेल्या ठिकाणी गटार असल्याने ऑइल माफियांना बसण्यासाठी मोठीं जागा देखील उपलब्ध झाली होती.

बारावे डम्पिंग ग्राउंडला आगीचे ग्रहण,पहाटे भली मोठी आग; तर दिव्यात ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू
हे वास्तव समोर आल्यानंतर शिळ डायघर पोलिसांनी प्रसार माध्यमांसह अन्य कोणालाही त्या जागी प्रवेश करू दिला नाही. मात्र किती दिवसांपासून ही ऑइल चोरी या परिसरात सुरू होती? कोण या मागील सूत्रधार आहे. त्याचा शोध घेण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर उभं ठाकल आहे.

चोरीसाठी खड्डा देखील तयार

शिळफाटा चौक परिसरात क्रूड ऑइलची चोरी करण्यासाठी व्हॉल मुख्य वाहिनीला बसवण्यात आले आहे. त्यामधून दररोज क्रूड ऑइल चोरी सुरू असायची. मात्र या प्रकरणाची कल्पना प्रशासनाला कशी नव्हती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. क्रूड ऑइल चोरीसाठी एक खड्डा देखील तयार करण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे क्रूड ऑइल लहान ड्रममध्ये भरून बाजारात विक्री केले जात आहे. मात्र क्रूड ऑइल चोर कोण आहे. हे शोधण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर असणार आहे.

आयुष्यभराची साथ सोडली सोबतच, पत्नीच्या मृत्यूनंतर पाच तासांनी पतीने सोडले प्राण
जिल्हाधिकाऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश…

शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर स्थानिक आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे, ठाणे तहसीलदार युवराज बांगर यांच्या सोबत घटनास्थळी भेट दिली होती. यानंतर तातडीने मनसेकडून मदतीची मागणी करण्यात आली होती. शुक्रवारी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या माध्यमातून नुकसान झालेल्या घरांचे आणि दुकानांचे पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र त्या नंतर मदत कधी मिळणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

लेकीला भेटण्यासाठी घरातून निघाले, मात्र भेट झालीच नाही; पती-पत्नीसोबत घडलं अघटित
२१ तासांनी गूढ आलं समोर

शिळफाटा चौकात झालेल्या स्फोटानंतर आगीची तीव्रता अधिक असल्याने अग्निशमन दलाला देखील कारण कळू शकत नव्हते. मात्र शनिवारी पहाटेच्या सुमारास तब्बल २१ तासांच्या कालावधीनंतर स्फोट आणि आगीचं कारण हे समोर आलं आहे, त्यामुळे आता बीपीसीएल कंपनी आणि प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

बड्डे शहेनशहाचा…जल्लोष साऱ्या गावाचा; डोंबिवलीत बैलाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here