दरम्यान, गोळीबाराची ही संपूर्ण घटना CCTV मध्ये टिपली गेली आहे. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फुलेनगर परिसारत दयानंद महाले यांचा मुलगा चौकात बसलेला होता. जुन्या भांडणाच्या कुरपतीवरून येथे ७-८ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. यात त्याने हा वार हुकून घराकडे पळ काढला. एवढ्यावर न थांबता हल्लेखोरांनी थेट महाले यांच्या घरावर हल्ला करत गोळीबार केला. तर जाब विचारण्यासाठी आलेल्या उषा महाले यांच्या दिशेनेही हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळीबार केला. सुदैवाने उषा महाले यांच्या छाती जवळून ही गोळी चाटून गेल्याने त्या थोडक्यात बचावल्या आहेत.
महाले यांच्या श्वानवरही हल्लेखोरांनी गोळी झाडली होती. हल्लेखोरांकडून सुमारे चार गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
माझ्या पोरानं आत्महत्याच करायची बाकी आहे; लेकानं दीड एकर कांद्याचं शेत पेटवलं; आईची हळहळ
हा संपूर्ण हल्ल्याचा थरार परिसारत असलेल्या सीसीटीव्हीत मध्ये कैद झाला आहे. तर रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. रात्री गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण फुले नगर परिसर हादरून गेला होता. मागच्या आठवड्यातच या भागात तीन जणांच्या टोळक्याकडून एका तरुणाची धारदार शस्त्राने भर रस्त्यात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर काल रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांच जरब आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.