पुणे: पुण्यातील जुन्नर जिल्ह्यात गेल्या महिन्यांत ४ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. जुन्नरमधील वन विभागाच्या हद्दीत गेल्या ४ महिन्यांत ४ बिबटे मृतावस्थेत आढळले आहेत. या बिबट्यांचा मृत्यू भुकेनं तडफडून झाल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. पर्यावरणातील बिघडतं संतुलन यासाठी जबाबदार आहे. राज्यातील बिबट्यांच्या संख्येवर नजर टाकल्यास सर्वाधिक बिबटे याच परिसरात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचं बिघडत चाललेलं संतुलन आणि भुकबळींमुळे होणारे बिबट्यांचे मृत्यू चिंतेची बाब आहे.

मंचर आणि शिरुरमध्ये बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. या भागात बिबट्यांचा सर्वाधिक अधिवास आहे. या भागातील बिबट्यांचं वयोमान १ ते १२ वर्षांपर्यंत आहे. शिकारीचा अभाव आणि कमी होत चाललेला अधिवास या दोन प्रमुख कारणांमुळे बिबट्यांचे मृत्यू होत असल्याचं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं.
पहाटेच्या सुमारास डेपोतील बस पेटली; कंडक्टरचा होरपळून अंत, सवय जीवावर बेतली
गेल्या दोन वर्षांत आम्ही या विभागात बिबट्यांमधील संघर्ष पाहिला आहे. एखाद्या प्रदेशावरील वर्चस्वासाठी बिबट्यांमध्ये संघर्ष होतो. गेल्या २ वर्षांत हा संघर्ष प्रचंड प्रमाणात वाढला आहे. असा प्रकार आम्ही याआधीही कधीच पाहिला नव्हता. यातून पर्यावरणाचं बिघडतं संतुलन अधोरेखित होतं, अशी माहिती जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.

अतिशय तरुण आणि वृद्ध बिबट्यांकडे स्वत:चा वर्चस्व असलेला प्रदेश नसतो. त्यामुळे त्यांना शिकार मिळत नाही. शिकार करू शकणाऱ्या बिबट्यांनी सर्वाधिक भागावर वर्चस्व मिळवलं आहे. जंगलात प्राण्यांची संख्या अधिक असल्यावर अशी परिस्थिती उद्भवते. जुन्नरमध्ये बिबट्यांची घनता अधिक आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत, असं सातपुते म्हणाले.
तो हेतू नव्हता, माफी मागते! होळीला गैरवर्तन सहन करणारी जपानी तरुणी भारताबद्दल काय म्हणाली?
मंचरमध्ये ५ आणि ८ मार्चला बिबट्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शवविच्छेदनातून काही समान बाबी समोर आल्याचं मंचरच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर स्मिता राजहंस यांनी सांगितलं. ‘दोन्ही बिबट्यांनी तीन ते चार दिवसांपासून काहीच खाल्लं नव्हतं. मंचरमध्ये पहिल्यांदाच बिबट्यांचा भूकबळी गेल्याची घटना घडली,’ असं राजहंस म्हणाल्या.
नशामुक्ती केंद्रात तरुणाला बेदम मारलं; एका हट्टानं जीव गेला; रातोरात गुपचूप अंत्यविधी, पण…
मंचरमध्ये मृतावस्थेत आढळलेला एक बिबट्या एक वर्षांचा होता. त्याच्या बरगड्या आणि इतर अवयव अतिशय नाजूक होते. त्याच्या शरीरात आम्हाला अन्न सापडलं नाही. त्याचा मृत्यू भुकेनं तडफडून झाला होता, अशी माहिती कळंबमधील पशूचिकित्सा अधिकारी वृशाली म्हस्के यांनी दिली. मंचर रेंजमध्ये ९२ गावं येतात. जवळपास ९ हजार हेक्टरवर हा भाग पसरला आहे.

What Causes Of Parkinson’s Disease | कंपवात कशामुळे होतो?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here