याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी सविता नामदेव राठोड हिने पती नामदेव राठोड याला त्यांच्या मुलाला सांगली येथे त्यांच्या मूळगावी घेऊन जाण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी नामदेव याने पत्नी सविता हिला शनिवारी रात्री हिंजवडी फेज २ येथे गाठले आणि तिच्या पोटात चाकू भोकसुन खून केला. यानंतर आरोपी घटना स्थळावरून फरार झाला होता. हिंजवडी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी डोकेवर काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज गुन्ह्यांचे प्रकार घडत असून त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्टेशनपासून काही अंतरावर ही घटना घडल्याने पोलिसांसमोर तपास करण्याचे आव्हान होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणावरून अशा घटना घडू लागल्याने समाजात कुठल्या दिशेने जात आहे? असं प्रश्न उपस्थित होतोय.