case on mla bunty bhangdia, मोठी बातमी! भाजप आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल – a case of molestation has been filed against bjp mla bunty bhangdia
चंद्रपूरः जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील काँग्रेस जिल्हा सरचिटणीसाचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता आणि त्यांचे पती साईनाथ बुटके हे चिमूर येथे राहतात. साईनाथ यांचे मोठे बंधू गजानन बुटके हे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आहेत. ११ तारखेला सायंकाळी साडे सातच्या सुमारास भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह बुटके यांच्या घराच्या बाहेर आले. त्यांनी बुटके यांना शिवीगाळ करून त्यांच्या घरात जबरदस्तीने शिरले आणि साईनाथ यांना मारहाण करत बाहेर घेऊन आले. या मारहाणीला विरोध केला असता, त्यांचा विनयभंग केला आणि मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पाच दिवसांपासून बेपत्ता होता, वडिलांनी सगळा गाव पिंजून काढला, अखेर गावाकडच्या विहिरीत… तसंच, भांगडिया यांच्या कार्यकर्त्यांनी पीडिता, साईनाथ आणि त्यांच्या दोन्ही लहान मुलांना मारहाण केली. गजानन बुटके हे त्याच वेळी घरी पोहोचले, त्यांनीही भांगडिया यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना देखील मारहाण करण्यात आली, असंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या तक्रारीनंतर भांगडिया यांच्यासह त्यांच्या १५ ते २० कार्यकर्त्यांविरुद्ध कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.