ठाणे: नर्सेसला कामावरून काढण्याचा आणि ठाण्याचे पालक मंत्री यांचा काहीच संबंध नाही. त्यामुळे शिंदे यांची विनाकारण बदनामी करू नका. त्यांची बदनामी कराल तर याद राखा, ठाण्यातील शिवसैनिक तुम्हाला पळता भूई थोडी करतील, असा सज्जड इशारा ठाण्याचे महापौर यांनी दिला आहे.

ठाण्यात २५० नर्सेसला कामावरून काढण्यात आल्यानं मनसेने आंदोलन सुरू केलं आहे. त्यापार्श्वभूमीवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी मनसेला हा दम भरला आहे. ठाण्यात २५० नर्सेसला कामावरून काढल्याचं कारण देऊन आंदोलन केलं जात आहे. खरं तर असा कुठलाच प्रकार घडलेला नाही. रुग्ण आणि रुग्णालयाला चांगली सुविधा मिळावी म्हणून मुंबईच्या धर्तीवर या नर्सेसची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली होती. नवी मुंबईतही हेच करण्यात आलं. आम्ही टेंडर काढून खासगी एजन्सीला काम दिलं होतं. कंत्राटीपद्धतीने भरती असल्याची जाहिरातही आम्ही दिली होती, असं सांगतानाच उलट या नर्सेसला कामावर ठेवण्यास आम्ही एजन्सीला सांगितल्यानंतर त्यांनी ते मान्यही केलं आहे, असं महापौर म्हस्के यांनी सांगितलं.

मात्र, काही लोक ठाण्याला बदनाम करण्याचे उद्योग करत आहेत. आंदोलन करण्यासाठी काहीही कारणं शोधून आंदोलने केली जात आहेत. छोट्सं कारण मिळालं तरी आंदोलन करून प्रसिद्धीचा स्टंट केला जात आहे. त्यासाठी मुंबईतून नेते बोलावले जात आहेत. सरकारी कामात अडथळे निर्माण केल्याप्रकरणी मनसेच्या एका नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं सांगतानाच नर्सेसच्या भरतीशी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नसताना त्यांना विनाकारण बदनाम केलं जात आहे. शिंदेंवर आरोप केल्याने प्रसिद्धी मिळते म्हणून हा खटाटोप सुरू आहे. मात्र, शिंदेंची विनाकारण बदनामी केल्यास ठाण्यातील शिवसैनिक बाहेर पडून तुम्हाला पळता भूमी थोडी करतील. याद राखा नाकाच्यावर पाणी गेल्यास तुमची केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here