पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत रिक्षाला अज्ञात चारचाकी वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून अन्य ५ जण जखमी झाले आहेत. हवेली तालुक्यातील सोरतापवाडी फाटा परिसरात हा अपघात झाला आहे.

भानुदास गोरे (वय अंदाजे- ५०, रा. थेऊर, ता. हवेली, मूळ रा. लातूर) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुनीता जगताप व इंदू जगताप (दोघीही रा. बेलसर, ता. पुरंदर) अशी गंभीर जखमी झालेल्या दोघींची नावे आहेत. तसंच विष्णू राजाराम अंधारे व छाया अंधारे (रा. दोघेही सोरतापवाडी, ता. हवेली) असे किरकोळ जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. जखमींवर उरुळी कांचन येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सख्ख्या चुलत बहिणीला गरोदर ठेवली, भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा, संगमनेरमधील धक्कादायक प्रकार

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर महामार्गावरून हडपसरवरून उरुळी कांचनच्या दिशेने एक रिक्षावाला जात असताना सकाळी पाऊणे बाराच्या सुमारास अचानक चारचाकी गाडीने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षात बसलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.

या घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठान व लाईफ केअर यांच्या रुग्णावाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना उपचारासाठी उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here