अमरावती : अमरावतीत मागील काही दिवसांपासून महिला व मुलींच्या शोषणाच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच शेजारी राहणाऱ्या एका युवकाने विवाहित महिलेला “वहिनी तुम्ही मला खूप आवडता”, असं म्हणत तिचा विश्वास संपादन करून शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर या सर्व अश्लील प्रकारचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केलाचा धक्कादायक प्रकार अमरावतीत समोर आला आहे.

एका विवाहित महिलेला प्रेमजाळ्यात ओढून तिच्यावर अतिप्रसंग करून आरोपीने त्या क्षणाचा व्हिडिओ बनवून तो इंटरनेटवर व्हायरल केला. सदर बाब कळताच विवाहितेने पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरूध्द तक्रार नोंदवली. या प्रकरणी लोणी पोलिसांनी ११ मार्च रोजी आरोपी किरण काशिनाथ गजभिये (वय २९, जळू) याच्याविरूध्द बलात्कार, धमकी आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

भारताने गियर बदलला आणि डाव पलटला, पाहा आता सामन्याच्या पाचव्या दिवशी काय होऊ शकतं…
पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आणि ३६ वर्षीय पीडिता हे परस्परांचे परिचित होते. त्यातून त्यांच्यात संवाद देखील होता. तो तिच्या घरी नेहमीच ये-जा करायचा. अशातच, जानेवारी २०२० मध्ये त्याने “वहिनी तुम्ही मला खूप आवडतात”, म्हणत प्रपोज केला. विवाहितेचा पती हा दारुड्या असल्याने ती देखील आरोपीकडे आकर्षित झाली आणि त्याला सर्वस्व बहाल केलं. त्याचदरम्यान आरोपीने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्या क्षणाचा त्याने त्याच्या मोबाईलमध्ये गोपनीय पद्धतीने व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढल्याची कुणकुण लागताच तो व्हिडिओ डिलिट करण्याची विनंती पीडितेने आरोपीकडे केली.

मात्र, तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने त्या व्हिडिओचा फायदा घेत तिचं अनेकदा लैंगिक शोषण केलं. काही दिवसांनी आरोपीने तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यासोबतच इंटरनेटवर अपलोड करून व्हायरल केला. पीडितेच्या काही परिचयातील व्यक्तींनी तो प्रकार पीडितेच्या लक्षात आणून दिल्यावर त्या व्हिडिओमुळे पीडितेची सामाजिक बदनामी झाली. त्यामुळे ११ मार्च रोजी रात्री पीडितेने लोणी पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दिली आहे.

आठवलेंचा लोकसभा मतदारसंघ ठरला, इच्छाही बोलून दाखवली, सेना खासदाराचं टेन्शन वाढलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here