pune-solapur highway, तो प्रवास ठरला अखेरचा, पुणे -सोलापूर महामार्गावर भीगवणजवळ भीषण अपघात ; दोघे जागीच ठार, तिघे गंभीर – two people lost lives and three were seriously injured in a horrific accident on the pune solapur highway
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत चालकाचे चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. १२) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वैभव विठ्ठल जांभळे (वय -२४, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) प्रतीक पप्पू गवळी (वय – २२ रा. मोशी ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
या भीषण अपघातात आसिफ बशीर खान (वय – २२, राहणार- भिगवन, तालुका- इंदापूर), सुरज राजू शेळके (वय – २३ वर्षं, राहणार- भिगवण तालुका इंदापूर) व ऋषिकेश बाळासाहेब येळे (वय -२२, राहणार- इंदापूर, तालुका- इंदापूर) अशी अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. जखमींवर भिगवण येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लहान बहीण घरी आली, दरवाजा ठोठावला, आतून कुणीही दरवाजा उघडेना; उघडताच पायाखालची जमीन सरकली चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
पोलिसांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने हे पाचहीजण चारचाकी गाडीतून निघाले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हॉटेल पंचरत्नजवळ येताच कारवरील चालकाचे नियंत्रण सुटलेआणि भरधाव जाणारी ही कार पलटली.
दरम्यान, या अपघातात रस्त्यावरच या चारचाकी गाडीने ४ ते ५ पलट्या मारल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी स्थानिकांनी दिली आहे. या वरून या कारचा वेग अमर्याद असल्याचा अंदाज येतो. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. रावणगाव पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.
यातील वैभव हा व्यवसायिक असून तो टेलरकाम करीत होता. तर प्रतिक हा स्वामी चिंचोली येथील दत्तकला संस्थेत फार्मसी मध्ये शिकत होता. हा अपघात अतिवेगात असलेल्या स्विफ्ट कारवरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.