सांगली : हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात जुनी पेन्शन लागू केली नाही म्हणून तेथील लोकांनी सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचलं. तेच आता महाराष्ट्रात देखील करावं लागेल, असे जाहीर आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी केले. सांगलीमध्ये जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षक कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा निघाला होता. या मोर्चाला संबोधत करताना रोहित आर आर पाटील यांनी जोरदार भाषण ठोकलं. तसेच सत्ताधारी शिंदे फडणवीसांना जुनी पेन्शन योजना लागू करावीच लागेल, असंही ठणकावून सांगितलं.

हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ज्या पद्धतीने तिथल्या माजी मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकत नाही,असं सांगितलं. त्यानंतर तिथल्या लोकांनी सरकार उलथवलं. आता महाराष्ट्रातले भाजपाचे वरिष्ठ नेते जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल, असे बोलत आहेत. त्यामुळे हिमाचालची पुनरावृत्ती आता या ठिकाणी करावी लागेल, असे रोहित आर आर पाटील म्हणाले.

शिवरायांबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट, नागरिकांच्या संतापानंतर पोलिसांची कडक अ‍ॅक्शन
कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षितता असणं खूप गरजेचं आहे. ती जाणवत नसल्यामुळे आणि आपल्याबरोबर आपल्या मुलांचे भविष्यही अंधारात जातंय की काय, असा प्रश्न त्यांच्या मनात असल्यानेच जुन्या पेन्शनची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. सेवाकाळात एखाद्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती घ्यावीशी वाटली तर त्याला त्या योजनांचा लाभ आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी रोहित पाटील यांनी केली.

आठ दिवसांपूर्वी शेततळं बांधलं, पोरं खेळायला म्हणून गेली अन् नको ते होऊन बसलं…
सांगलीच्या या ऐतिहासिक चौकात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भाषण केलं, वसंतदादा पाटील आणि आर आर पाटील यांनी भाषण केलं, त्याच चौकात उभं राहून मलाही एवढ्या कमी वयात भाषण करता आलं, असं सांगत रोहित पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here