नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत नवभारत टाइम्सने रविवारी कनॉट प्लेस येथे आयोजित केलेल्या ‘ऑल विमेन बाइक रॅली’मध्ये महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. ‘भुला दे डर, जी बेफिकर’ या थीमवर आधारीत या विशेष अशा रॅलीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी रॅलीमध्ये भाग घेतलेल्या महिलांचे कौतुक केले. महिलांच्या सशक्तिकरणाच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबाबत राष्ट्रपतींनी नवभारत टाइम्सचे अभिनंदन केले.

स्वावलंबी भारत आणि नवा भारत घडवण्याचे उद्दिष्ट तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपल्या मुली आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासाने पुढे जातील, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या. अशा कार्यक्रमांचा संदेश प्रत्येक गावागावापर्यंत, नगरानगरापर्यंत पोहोचेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दुर्गम खेड्यात राहणाऱ्या आपल्या मुलींना नेहमी निर्भय वाटावे आणि आत्मविश्वासाने त्यांनी जीवनात पुढे जावे, हे आपल्या सर्वांचे ध्येय असले पाहिजे. महिलांच्या प्रतिष्ठेचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या राज्यघटनेत असे म्हटले आहे की, महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असलेल्या प्रथा सोडून द्याव्या हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असेल, असेही राष्ट्रपती पुढे म्हणाल्या.

All Women Bike Rally

ऑल विमेन बाईक रॅली

रॅलीला ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवताना राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, ‘भावी पिढ्यांची सुरक्षा आपल्या मुलींच्या सुरक्षित जीवनात आहे. महिलांच्या सन्मानाचा पाया कुटुंबातच घातला जाऊ शकतो.प्रत्येक आई आणि बहिणीने आपल्या मुलामध्ये आणि भावामध्ये सर्व महिलांचा आदर करण्याची संस्कृती रुजवावी.असे झाले तरच आपल्या मुली चांगल्या वातावरणात पुढे जाऊ शकतील आणि देश आणि समाजासाठी अधिक योगदान देऊ शकतील. त्याचबरोबर कुटुंबासोबतच मुलांमध्ये महिलांबद्दल आदर आणि संवेदनशीलता वाढवण्याची जबाबदारी शिक्षकांचीही आहे.’

तो प्रवास ठरला अखेरचा, पुणे -सोलापूर महामार्गावर भीगवणजवळ भीषण अपघात ; दोघे जागीच ठार, तिघे गंभीर

President Murmu flags off All Women Bike Rally

राष्ट्रपती मुर्मू यांनी महिलांच्या बाईक रॅलीला दाखवला हिरवा झेंडा

देशाच्या मुलींना दिलेल्या संदेशात त्या म्हणाल्या, ‘निसर्गाने केवळ महिलांनाच माता बनण्याची क्षमता दिली आहे आणि ज्याच्यात मातृत्वाची क्षमता असते, त्याच्यात नेतृत्व क्षमता नैसर्गिकरित्या असते. सर्व मर्यादा आणि आव्हानांना न जुमानता आपल्या मुलींनी आपल्या अदम्य साहस आणि कौशल्याच्या बळावर यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आजच्या महिलांनी अशा अनेक क्षेत्रात प्रभावीपणे आपले स्थान निर्माण केले आहे, जिथे त्यांच्या प्रवेशाचा काही काळापर्यंत विचारही केला जात नव्हता.’

लहान बहीण घरी आली, दरवाजा ठोठावला, आतून कुणीही दरवाजा उघडेना; उघडताच पायाखालची जमीन सरकली
तत्पूर्वी, बाईक रॅलीच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा संदेश दिला. पंतप्रधान आपल्या संदेशात म्हणतात की, ‘महिला निर्णयक्षमता, दृढनिश्चय, निष्ठा आणि नेतृत्व यांचे प्रतिबिंब आहेत. त्या सैन्यात आपल्या शौर्याने आणि पराक्रमाने महिला देशाची प्रतिष्ठा वाढवत आहेत.’

All Women Bike Rally

ऑल विमेन बाईक रॅली

या विशेष रॅलीमध्ये विविध थीमचे कपडे परिधान केलेल्या महिलांनी भाग घेतला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या व्हिडिओ संदेशासह रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या रॅलीत दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना, केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश, चित्रपट अभिनेत्री सानिया मल्होत्रा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. रॅलीत २००० हून अधिक महिलांशिवाय बीएसएफची महिला बाइकर्स टीम सीमा भवानी आणि दिल्ली पोलिसांची महिला बाइकर्स टीमही यात सहभागी झाल्या होत्या. बाईक रॅलीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनीही बाइक चालवली. १८ ते ९५ वयोगटातील महिलांनी या बाईक रॅलीत भाग घेतला होता.

All Women Bike Rally

ऑल विमेन बाईक रॅली

दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी नवभारत टाइम्सचे आभार मानताना सांगितले की, ‘या महिला बाइक रॅलीचे आयोजन करणे ही मोठी गोष्ट आहे. या देशातील महिला आता फक्त घरात स्वयंपाक करत नाहीत, तर आता त्या देशाच्या खूप मोठ्या व्यक्ती देखील आहेत. आज देशाच्या राष्ट्रपतीही महिला आहेत. जेट विमाने उडवणारी एक महिलाही आहे. जहाजाची कमांडिंग एक महिला देखील आहे. लष्करापासून ते व्यवसायापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी यशाची नवी शिखरे गाठली आहेत. महिलांनी पत्रकारितेतही मोठी कामगिरी केली आहे.आम्ही दिल्लीतील महिलांना सुरक्षित वातावरण देऊ शकू ही आम्हाला आशा आहे.’
तर दर्शना जरदोश म्हणाल्या, ‘स्वातंत्र्याचे हे अमृतमहोत्सवी वर्ष चालू आहे. स्वातंत्र्याच्या १०० वर्षानंतरचा भारत कसा असेल आणि आपली भूमिका काय असेल, असा संकल्प घेऊन पुढे जायचे आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करत असून राष्ट्र उभारणीत महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे.’

हसन मुश्रीफ यांना सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स, कागलमध्ये तणावपूर्ण वातावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here