विशेष म्हमजे पीएलआय नुसार भारतीय स्मार्टफोन बाजारात ७० टक्के हिस्सा असलेल्या चीनच्या चार कंपन्यांचा यात समावेश करण्यात आला नाही. यात शाओमी, ओप्पो, व्हिवो आणि रिअल मी यांचा समावेश आहे. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच वर्षात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ११.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे ३ लाख प्रत्यक्ष तर ९ लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे.
वाचा-
या कंपन्यांनी उत्पादन सुरू केल्यानंतर ७ लाख कोटी रुपयांची निर्यात केली जाणार आहे. या योजनेनुसार तयार झालेले ६० टक्के फोन निर्यात केले जाणार आहेत.
एप्रिल महिन्यात आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने पीएलआय योजनेची घोषणा केली होती. यानुसार भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज दाखल करायचे होते. फोन निर्मिती करणाऱ्या क्षेत्रात सॅमसंग, फॉक्सकॉन हॉनहॉय, राइजिंग स्टार, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन सारख्या कंपन्यांनी रस दाखवला आहे. यातील फॉक्सकॉन हॉनहॉय, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या कंपन्या अॅपलसाठी उत्पादन करतात.
वाचा-
भारतीय कंपन्यांपैकी लाव्हा, डिक्सन टेक्नोलॉजी, मायक्रोमॅक्स, पॅडगेट इलेक्ट्रॉनिक्स, सोजो मॅन्यूफॅक्चरिंग सर्व्हिसेस आणि ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक यांचा समावेश आहे.
या योजनेनुसार मोबाइल निर्मिती करणाऱ्या या कंपन्याचे काम १५ ते २० टक्क्यांवरून वाढून ते ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत जाईल. पीएलआय योजनेनुसार सरकार कंपन्यांना ४१ हजार कोटी रुयपांचे इसेंटिव्ह देणार आहे. भारत मोबाइल निर्मिती क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सरकारला पहिले स्थान मिळवाचे आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
These are actually great ideas in concerning blogging.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.