आराः एका राँग नंबरवरुन फोन आला त्याच्याशी गप्पा मारता मारता दोघे प्रेमात पडले. प्रेमात इतके आकंठ बुडाले तकी दोघांनी पळून जाऊन लग्न देखील केले. मात्र, तरुणी तिच्या घरी आधार कार्ड विसरली ते परत आणण्यासाठी घरी गेली की तिथे घडलेला हायव्हॉल्टेज ड्रामापाहून सगळ्यांनीच डोक्यावर हात मारला. बिहारमधील आरा शहरात ही घटना घडली आहे.

आरा शहरात राहणारी रजनी कुमारीहिचे पटना जिल्ह्यात राहणारा राजेंद्रसोबत सूत जुळले. राँग नंबरवरुन दोघांमध्ये प्रेम जुळले. दोघांनी लग्नही केले. मात्र, त्यांच्या लग्नाला कुटुंबांचा विरोध होता. त्यामुळं दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी मुलीला आधार कार्डची गरज भासली. त्यासाठी ती आधार कार्ड घेण्यासाठी तिच्या माहेरी गेली.

ऊसतोड महिला कामगारांना मासिक पाळीची सुट्टी, चौथ्या महिला धोरणात सरकार करणार मोठ्या घोषणा
आधार कार्ड घेण्यासाठी आलेल्या मुलीसोबत आईचं भांडण झालं. त्यानंतर वाद इतका टोकाला गेला की दोघीही एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या. दोघींनीही शिवागळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. हा तमाशा बराचवेळ सुरु होता अखेर स्थानिक लोकांनी मुलीला आणि तिच्या आईला समजावून प्रकरण मिटवले.

महिला प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ची खास भेट; गर्दीतील प्रवास सुकर होणार आहे
मुलीच्या म्हणण्यानुसार, दोघंही एक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांनीही लग्न केलं आहे. याची माहिती तिच्या आईला होती म्हणून त्यांनी लेकीला मुलाच्या घरी सोडलं. आज जेव्हा ती आधार कार्ड घेण्यासाठी गेली तेव्हा त्याला मारहाण केली, असा आरोप तिने केला आहे. तर, आईनेही मुलीला स्विकारण्यास नकार दिला आहे. मुलीने पळून जाऊन लग्न केल्यामुळं समाजात त्यांची बेइज्जती झाली आहे. आम्हाला आता तिच्याशी कोणतच नातं ठेवायचं नाहीये, असं म्हणत तिच्या आईने संबंध तोडून टाकले आहेत. दरम्यान, या हायव्होल्टेज ड्रामाची चर्चा परिसरात चांगलीच चर्चेत आली आहे.

लक्झरी कारपेक्षाही महागडा बैल; किंमत ऐकून म्हणाल शेतकऱ्याचा नादच खुळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here