इंडियन प्रीमियर लीगपासून त्याने क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर टीम इंडियामध्ये आपले अटळ स्थान बनवले. मोहम्मद सिराज आता तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा गोलंदाज बनला आहे. तो भारताकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये दमदार गोलंदाजी करताना दिसतो. सिराज अत्यंत साध्या कुटुंबातील होता. त्याचे वडील ऑटोचालक होते. त्याची आई दुसऱ्यांच्या घरी काम करायची. सिराजने १५ नोव्हेंबर २०१५ रोजी रणजी ट्रॉफी स्पर्धेत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
मोहम्मद सिराजने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत टीम इंडियात आपली जागा पक्की केली. त्याने ४ नोव्हेंबर २०१७ रोजी न्यूझीलंड विरुद्ध भारतासाठी पहिला टी-२० सामना खेळला. मोहम्मद सिराज पदार्पणातच चांगलाच महागात पडला होता. त्याने ४ षटकात ५३ धावा लुटल्या होत्या. मात्र, त्याने एक विकेटही घेतली.
सिराजची क्रिकेट कारकीर्द
मोहम्मद सिराजने भारतासाठी आतापर्यंत १८ कसोटी, २१ एकदिवसीय आणि ८ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने अनुक्रमे ४७, ३८ आणि ११ विकेट घेतल्या आहेत. त्याने एका सामन्यात कसोटीत ५ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. सिराज आयपीएलमध्येही चांगली गोलंदाजी करतो. त्याने ६५ आयपीएल सामन्यात ५९ विकेट घेतल्या आहेत. सध्या सिराज टीम इंडियासोबत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या संघाचा भाग आहे. सिराजला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील ३ वनडे सामने खेळायचे असल्याने त्याला भारत-ऑस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे.