बुलंदशहर: एका भर चौकात १६ वर्षाची मुलीला घेऊन काही जण उभे असतात…जमलेल्या गर्दीतून तिच्या खरेदीसाठी बोली लावण्यात येते. एखाद्या वस्तूप्रमाणे त्या अल्पवयीन सुरू असतो आणि ती मुलगी हा प्रकार थांबवण्यासाठी गयवया करत रडत असते. एखाद्या चित्रपटाचे कथानक वाटणारी घटना उत्तरप्रदेशमधील बुलंदशहरमध्ये घडली. पोलिसांनी या प्रकरणी दोन महिलांसह सातजणांना अटक केली आहे.

या लिलावात २० वर्षाच्या युवकांपासून ८० वर्षांच्या वृद्धापर्यंत सहभागी होते. पीडित मुलगी ही रांची येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एक वर्षापूर्वी या मुलीच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर या मुलीच्या सावत्र आईने ५० हजार रुपयांना कलावती या महिलेला विक्री केली. कलावती या पीडित मुलीला घेऊन नौरंगाबाद या गावी पोहचली. गावात मुलीची विक्री होत असल्याचे कळताच गर्दी जमली. या गर्दीतच मुलीचा लिलाव सुरू झाला. यातील एका व्यक्तीने ८० हजार रुपयांची बोली लावलीदेखील मात्र, त्याच वेळेस पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी कलावती, राजेश देवी, धीरेंद्र, जितेंद्र, इंद्र सिंह, महेंद्र यांना अटक केली आहे.

नौरंगाबाद येथे राहणाऱ्या आरोपी महेंद्रच्या घरी कलावती मुलीला घेऊन आली होती. तेव्हाच आजूबाजूच्या परिसरात याची बातमी देण्यात आली. मुलीची खरेदी करण्यास आणि तिला पाहण्यासाठी अवघ्या काही क्षणात गर्दी जमली. काहींनी तर रांगाही लावल्या. बोली लावल्यानंतर काहीजण मुलीशी बोलायचे, तिला स्पर्श करायचे. या लिलावाबाबत मुलीला काहीच कल्पना नव्हती. मात्र, काही वेळेनंतरच तिला याची जाणीव झाल्यानंतर ती आपल्या सुटकेसाठी रडू लागली.

स्थानिक पोलिसांनी या लिलावाची माहिती एकाने दिल्यानंतर पोलीस दाखल झाले. आरोपी कलावतीने याआधीदेखील काही मुलींची विक्री केली असल्याचे तपासात समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी कलावती ही झारखंडमधील मुलींची ३० ते ५० हजार रुपयांमध्ये खरेदी करते आणि इतरत्र त्यांची एक लाख रुपयांमध्ये विक्री करते. उत्तर प्रदेशमधील बागपत, मुझफ्फनगर, बिजनौर, मेरठ, बुलंदशहर आदी जिल्ह्यांमध्ये मुलींची विक्री करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here