अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. त्यातून पीडित तरुणीला गर्भधारणा झाल्यावर बळजबरीने गर्भपात करण्यात आला. लग्नास नकार देत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही धक्कादायक घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीची दोन ते तीन वर्षांअगोदर फेसबुकवर अंकुश विनायक आठवले रा. शिवशक्तीनगर याच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाल्यावर अंकुशने पीडित तरुणीला प्रेमजाळ्यात फासले. त्यानंतर ते दोघे भाड्याने खोली करून सोबत राहू लागले. या काळात अंकुशने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. त्यातून पीडित तरुणीला गर्भधारणा झाली.

प्रेमी युगुलाचे मंदिरातच अश्लील चाळे, भक्ताने जाऊन रोखलं; तरुणाने क्षणात केल्याचं होत्याचं नव्हतं…
याबाबत माहिती मिळाल्यावर, अंकुशने पीडित तरुणीचा एका रुग्णालयात बळजबरीने गर्भपात केला. त्यानंतर पीडित तरुणीने अंकुशला लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पीडित तरुणीने लग्नासाठी तगादा लावल्यावर अंकुशने तिला मारहाण केली. त्यानंतर तो खोली सोडून निघून गेला. त्यामुळे पीडित तरुणी ही अंकुशच्या घरी गेली. यावेळी अंकुशच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित तरुणीने राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी अंकुशसह विनायक आठवले, अविनाश आठवले व एक महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

माणसं झाली झोंम्बी; एका औषधानं अमेरिकेचं काय झालं; रस्त्यांवरील भयानक दृष्याचा VIDEO पाहाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here