अमरावती: अमरावती जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून महिला व मुलींमधील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच मेळघाटातील एका गावात एका युवकाने अल्पवयीन मुलीशी लग्न केलं आणि त्यानंतर तिचं वारंवार लैंगिक शोषण केलं. यातून महिलेनं बाळाला जन्म दिला. त्यानंतर नराधम पित्याने तिला बाळासह घराबाहेर काढलं.

एका अल्पवयीन तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण करून तिच्यावर मातृत्व लादण्यात आले. ही धक्कादायक घटना धारणी ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हिरामन मावसकर (२४) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. राजेंद्रनं पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आपल्यासोबत घरी नेले. सोबत वास्तव्यास असताना त्यानं पीडित तरुणीचं वारंवार लैंगिक शोषण केलं. त्यातून तरुणीला गर्भधारणा झाली. प्रसुती होऊन तिनं बाळाला जन्म दिला. त्यानंतर राजेंद्रनं तिला बाळासह घरातून हाकलून दिलं.
पहाटेच्या सुमारास डेपोतील बस पेटली; कंडक्टरचा होरपळून अंत, सवय जीवावर बेतली
सदर प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली. त्यामुळे पीडित तरुणीने धारणी ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजेंद्रविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here