मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा एका रॅलीतील आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो मॉर्फ केलेला व्हिडीओ असून मातोश्रीवरुन तो व्हिडीओ व्हायरल करण्याचे आदेश दिले गेले, असा आरोप शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. तसेच संबंधितांविरोधात शीतल म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनीही पोलीस ठाण्यात जाऊन वडिलांची बदनामी होत असल्याची तक्रार दाखल केली आहे. राजकीय हेतूने वडिलांवर आरोप करुन माझ्या वडिलांना बदनाम करण्याचा कारस्थान आहे. त्याचदृष्टीने मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल केला जात आहे, असा आरोप राज सुर्वे यांनी केला आहे. दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्या व्हिडीओचे पडसाद उमटले असून भाजप-शिवसेनेच्या महिला आमदारांनी संबंधित आरोपींविरोधात तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागाठणे येथे आ. प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमास आले होते. तिथे एक व्हिडीओ काढून त्यावर चुकीच्या पद्धतीने गाणे टाकून आणि चुकीचा संदेश लिहून मातोश्री या फेसबुक पेजवर व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ठाकरे गटाच्या आयटी सेलकडून तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला, असा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला. यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रारही नोंदविली आहे.

आमदार प्रकाश सुर्वे यांची पोलीस ठाण्यात धाव

रविवारी शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली असताना आज प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे यांनीही पोलिसांत तक्रार दिली. राजकीय वैमनस्यातून माझ्या वडिलांची बदनामी केली जातीये. संबंधित आरोपींविरोधात लवकरात लवकर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी राज सुर्वे यांनी केलीये.

शीतल म्हात्रेंची ‘त्या’ व्हिडिओबाबत पोलिसात तक्रार, विरोधकांना सुनावलं, काहीच करण्यासारखं नसल्यानं ते…
विधानसभेत भाजप-सेना महिला आमदार आक्रमक

शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओची सखोल चौकशी करावी. नगरसेविका राहिलेल्या प्रतिष्ठीत महिलेबाबत व्हिडीओची मॉर्फींग झाली आहे. एका महिलेने माध्यमासमोर येऊन मी चुकीची नाही असं कितीवेळा स्वतःला सिद्ध करायचं. यावर कधी कारवाई होणार? या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल. ज्याने हे केलं त्यावर कारवाईचे व्हावी, अशी मागणी भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी केली. तर आमदारा प्रकाश सुर्वे यांच्याबरोबर महिला कार्यकर्तीचा व्हिडीओ मॉर्फ करून तो व्हिडीओ व्हायरल केला जातोय. ही वेळ आज त्यांच्यावर आहे, उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते, असं सांगताना शीतल म्हात्रे प्रकरणात चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी आमदार यामिनी जाधव यांनी केली.

तुमची पापं लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू नका, शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात संजय राऊतांचा इशारा
मी शिंदेंना साथ दिल्यानेच माझ्यावर गलिच्छ आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात काम करीत असल्यामुळेच माझ्यावर गलिच्छ आरोप करण्यात येत आहेत. ठाकरे गटाकडून वाईट मेसेजसह व्हिडीओ मॉर्फ करून समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला, असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला. याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून, एखाद्या महिलेच्या विरोधात बोलण्यासारखे काहीही नसले की, चारित्र्यहनन केले जाते, असेही त्या म्हणाल्या. शीतल म्हात्रे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर आज प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे यांनीही पोलिसांत तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here