अमरावती : संयुक्त आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते किरणकुमार रेड्डी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. किरणकुमार रेड्डी यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. रेड्डी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना एका ओळीचं राजीनामा पत्र पाठवलं आहे. त्या पत्राद्वारे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

किरण कुमार रेड्डी यांनी संयुक्त आंध्र प्रदेशचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. २०१० ते २०१४ या कालावधीमध्ये ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसमधील पदांचा राजीनामा दिल्यानंतर रेड्डी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. केंद्रातील यूपीए सरकारनं आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा निर्णय घेत दोन राज्यांची निर्मिती केली होती. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. या प्रस्तावाला विरोध करत किरण कुमार रेड्डी यांनी पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यावेळी देखील पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

जय समैक्य आंध्र पक्षाची स्थापना, विसर्जन आणि पुन्हा काँग्रेसमध्ये

२०१४ मध्ये किरणकुमार रेड्डी यांनी काँग्रेसचा राजीनामा देत जय समैक्य आंध्र पक्षाची स्थापना केली होती. त्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्यानं ते राजकारणापासून दूर गेले होते. चार वर्षानंतर २०१८ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यानंतर ते देखील पक्षात सक्रीय नव्हते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते फारसे सक्रीय नव्हते.

६ चेंडू, ८ धावा आणि शेवटच्या ओव्हरमध्ये थरार, न्यूझीलंडने लास्ट बॉलवर केला श्रीलंकेचा गेम, पाहा VIDEO

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जबाबदारी मिळेल, अशी आशा रेड्डी यांना होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ते पक्षात सक्रीय नसल्यानं त्यांना संधी मिळाली नाही, अखेर त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. किरण कुमार रेड्डी २००९ ते २०१० मध्ये आंध्र प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. २००४ ते २००९ मध्ये ते पक्षाचे प्रतोद होते.

टॉमेटोच्या एका क्रेटला अवघे १० रुपये, लागवडीचा खर्चही निघेना; शेतकऱ्याने रस्त्यावरच लाल चिखल केला

भाजपमध्ये राष्ट्रीय राजकारणात संधी मिळणार असल्याच्या चर्चा

किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर त्यांच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार किरण कुमार रेड्डी यांना भाजपमध्ये चांगलं पद आणि राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळणार असल्याच्या चर्चा आहेत.

शीतल म्हात्रे-प्रकाश सुर्वे यांच्या व्हिडीओवर अजितदादा म्हणाले, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या…

ऐनवेळी थेट संसदेत बंडखोरी केली, भाजपने बदला घेतला आणि कारकीर्द संपुष्टात आणली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here