पुणे : पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या कारेगाव या गावाजवळ एका शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फोनवर बोलत असताना असताना ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे शिक्षक पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयात शिकवत होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

संजय सीताराम कदम (वय ४५ वर्ष) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. गेल्या २७ वर्षांपासून ते या विद्यालयात ज्ञानदानाचे काम करत होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत असून विद्यार्थी देखील धक्क्यातून सावरले नाहीत. याबाबत राजेंद्र बाळासाहेब धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे.

विहिरीच्या पाण्याचा वाद जीवावर बेतला, सांगलीत काका-पुतण्याची हत्या
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजय कदम हे आज ( सोमवारी) सकाळच्या सुमारास आपली दुचाकी एम एच १२ एल जी ७८५१ या दुचाकीवरून वाडेगव्हान येथे जात असताना त्यांना फोन आला. त्यामुळे त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन फोनवर बोलू लागले. तेवढ्यात पाठीमागून भरधाव वेगात दोन ट्रॉली घेऊन जाणारा ट्रॅक्टर आला आणि रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत असलेल्या कदम यांना धडक दिली. त्यात ते खाली पडले अनाई ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. त्यात ते जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

महिलेच्या घरी रात्रभर मुक्काम, पहाटे खून, बाथरुममध्ये मृतदेह, पोलिसांनी सहा तासात छडा लावला
घटनेनंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिस दाखल झाले. त्यांनी ट्रॅक्‍टर चालक महेश किसन चव्हाण (रा. उंबरखेडा, ता. कन्नड, जि. अहमदनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्याचा जुगाड; भंगारात पडलेली बैलगाडी थेट ट्रॅक्टरला जोडली अन् बनवली भन्नाट ट्रॉली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here